SA vs IND : तगड्या टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, साऊथ अफ्रिकेसमोर तीन दिवसात गुडघे टेकले!
SA vs IND Centurion Test : तगड्या टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेसमोर फक्त 3 दिवसात गुडघे टेकले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी लाजीरवाणा पराभव झालाय. त्यामुळे आता मालिकेत साऊथ अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
South Africa vs India, 1st Test : तगड्या टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेसमोर फक्त 3 दिवसात गुडघे टेकले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात (SA vs IND Centurion Test) टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी लाजीरवाणा पराभव झालाय. त्यामुळे आता मालिकेत साऊथ अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 245 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आफ्रिका संघाने तगडी झुंज देत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं अन् सामन्यात पकड मिळवली होती. त्यानंतर भारताला दुसऱ्या डावात साऊथ अफ्रिकन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची कंबर मोडली. त्यामुळे आता टीम इंडियाने पहिला कसोटी सामना 1 डाव आणि 32 धावांनी गमावला आहे.
भारताला पहिल्या डावात झटपट तंबूत धाडल्यानंतर आफ्रिकेने 408 धावांचा डोंगर उभारला. यजमान संघाकडून डीन एल्गरने सर्वाधिक 185 धावा केल्या, त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांना घाम फुटला होता. मार्को जानसेन याने केलेल्या 84 धावांमुळे अफ्रिकेला बुस्टर मिळाला. मात्र, टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने 4 विकेट्स घेतल्या. तर सिराजच्या खात्यात 2 विकेट्स आल्या होत्या.
भारताचा दुसरा डाव पत्त्यासारखा कोसळला. यशस्वी जयस्वाल दोन्ही इनिंगमध्ये फेल ठरला तर कॅप्टन रोहितला देखील भोपळा फोडता आलं नाही. त्याचबरोबर शुभमन गिलने आणि विराट कोहलीने साभाळायचा प्रयत्न केला. मात्र, शुभमन बाद झाला. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात टिकता आलं नाही अन् तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाचा खेळ खल्लास झाला. विराट कोहलीने दुसऱ्या इनिंगमध्ये सर्वाधिक 76 धावांची खेळी केली.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन) : डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नंद्रे बर्गर.
भारत (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.