पोर्ट एलिजाबेथ : भारताविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेनं पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये भारतीय टीममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६ मॅचच्या वनडे सीरिजमध्ये भारत ३-१नं आघाडीवर आहे. डरबनमध्ये झालेली पहिली वनडे भारतानं ६ विकेटनं, सेंच्युरिअनमध्ये झालेली दुसरी वनडे ९ विकेटनी आणि केप टाऊनमध्ये झालेली तिसरी वनडे १२४ रन्सनी जिंकली. पाचव्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ५ विकेटनी विजय झाला.


अशी आहे भारतीय टीम


रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, एम.एस.धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा


या ५ रेकॉर्डवर विराट सेनेची नजर 


१ दक्षिण आफ्रिकेमध्ये भारताला आत्तापर्यंत एकही सीरिज जिंकता आली नाही. एक मॅच जिंकून भारत २६ वर्षांनंतर सीरिज जिंकण्याचे रेकॉर्ड करेल. 


२ पोर्ट एलिजाबेथमध्ये आत्तापर्यंत खेळलेल्या एकही मॅचमध्ये भारताला विजय मिळालेला नाही. २६ वर्षांमध्ये भारत या मैदानात ४ मॅच खेळला आहे. या सगळ्या मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 


३ धोनी या मॅचमध्ये १० हजार रन्स पूर्ण करु शकतो. धोनीनं वनडे क्रिकेटमध्ये ९९५४ रन्स केल्या आहेत. १० हजार रन्स पूर्ण करण्यासाठी धोनीला ४६ रन्सची आवश्यकता आहे. कुमार संगकारानंतर १० हजार रन्स करणारा धोनी दुसरा विकेट कीपर बनेल. 


४ युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी सीरिजमध्ये आत्तापर्यंत १२-१२ विकेट घेतल्या आहेत. या दोघांनी आता एकही विकेट घेतली तर दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे सीरिजमध्ये स्पिनरनं घेतलेल्या या सर्वाधिक विकेट असतील. 


५ विराट कोहलीनं या मॅचमध्ये आणखी २ कॅच पकडले तर तो दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये कोणत्याही वनडे सीरिजमध्ये विकेट कीपर सोडून सर्वाधिक कॅच पकडणारा भारतीय खेळाडू बनेल. विराटच्या नावावर या सीरिजमध्ये १६ कॅच आहेत. राहुल द्रविडनं १७ कॅच पकडले होते. भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये विकेट कीपर सोडून सर्वाधिक कॅच पकडण्याचं रेकॉर्ड ग्रॅम स्मिथच्या नावावर आहे. स्मिथनं सीरिजमध्ये १९ कॅच पकडले होते.