मुंबई: दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपरकिंग संघाचा फलंदाज फाफ ड्यु प्लेसिसने एक धक्कादायक खुलासा केला आहे. फाफ आणि त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीबद्दल त्याने मोठा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2011च्या वर्ल्डकपमधून 49 धावा कमी पडल्यानं दक्षिण अफ्रिकेला क्वाटर फायनलमधून माघारी परतावं लागलं होतं. दक्षिण अफ्रिकेचा पराभव झाल्यानंतर फाफ ड्यु प्लेसिस आणि त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 


त्या सामन्यात फाफ डु प्लेसिसने 43 चेंडूत 36 धावा केल्या होता. ड्यू प्लेसिस म्हणाला की, सोशल मीडियावर त्याला आणि त्यांची पत्नी  इमारी विसर या दोघांनाही धमकी मिळाली होती. 


डु प्लेसिसने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, 'क्वार्टर फायनल सामन्यानंतर मला धमक्या येण्यास सुरवात झाली. माझ्या बायकोला देखील तिला जिवे मारण्याची धमकी मिळाली. आम्ही सोशल मीडिया आमच्यावर खूप टीका देखील झाली. धमक्या देणारे लोक खूप जवळचे होते. अशावेळी काहीच सूचत नाही. खूपदा सोशल मीडियावरच्या झालेल्या टीका आंतर्मुख व्हायला भाग पडतात. जवळपास प्रत्येक खेळाडू या परिस्थितीतून कधी ना कधी गेलेला असतो.'


2011 वर्ल्डकपच्या क्वाटर फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामना झाला होता. त्यावेळी दक्षिण अफ्रिका संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.