नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्राकडे गांभीर्याने पाहात असल्याचा दावा सरकार वारंवार करते. प्रत्यक्षात हा दावा किती पोकळ आहे याचा धडधडीत पुरावा पुढे आला आहे. स्पेशल ऑलिंम्पिक्स वर्ल्ड समर गेम्स 2015मध्ये दोन सुवर्णपदक मिळवलेल्या खेळाडूवर पोट भरण्यासाठी मोलमजूरी करण्याची वेळ आली आहे.


नूसत्या घोषणा, प्रत्यक्षात काहीच नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजबीर सिंह असे या खेळाडूचे नाव आहे. क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर राजबीरने जी कामगिरी केली, त्यामुळे भारताची प्रतीमा नक्कीच उंचावली. सुवर्ण पद जिंकून राजबीर जेव्हा भारतात आला तेव्हा त्याचे प्रंचड मोठ्या प्रमाणात स्वागतही झाले. पण, तो सर्व प्रका केवळ एक नाटक ठरला. विशेष असे की, राजबीर जेव्हा भारतात आला तेव्हा पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री दलबीर सिंग यांनी राजबीरचे कौतूक करत त्याला 15 लाख रूपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. तसेच, त्याला 10 लाख रूपये केंद्र सरकारकडून बॉन्ड्सच्या रूपात मिळणार होते. मात्र, त्याताल एक रूपयाही आतापर्यंत राजबीरपर्यंत पोहोचला नाही. 


मुख्यमंत्र्यांनी केले ट्वीट


पंजाबजे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेत ट्विट केले आहे की, 'या विषयावर मी क्रीडा सचिवांकडून तपशीलामध्ये माहिती मागवली आहे. राजबीरला सरकारकडून जी काही मदत करता येऊ शकेल ती करण्यास सरकार कटीबद्ध आहे.'


एकाच खोलीत राहतात ते चौघे


दरम्यान, एका छोट्याशा खोलीत आपल्या चार कुटुंबियांसोबत राजीबीर राहोतो. राजबीरचे वडील बलीबीर यांनी प्रतिक्रीया व्यक्त करताना म्हटले की, त्यांचा मुलगा हा इतरांपेक्षा वेगळा आहे. पण, सरकारी अधिकारी आणि उदासिनतेचा तो बळी ठरला. बलबीरने सांगितले की, 2015मध्ये  स्पेशल ऑलिंम्पीकमध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल सरकारने त्याला 15 लाख रूपये देण्याची घोषणा केली होती. तसेच, तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनीही त्याला एक लाख रूपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यातील केवळ 50 हजार रूपयांचा चेक राजबीरला मिळाला. उर्वरीत रक्कम मिळण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत, असेही बलबीर सांगतो.



2019 ऑलिम्पीकमध्ये संधी मिळणार का?


पुढे बलबीरने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्यानंतर त्याला 10 लाख रूपये दिले गेले. मात्र, उर्वरीत रक्कम त्याला आजही मिळाली नाही. तसेच, क्रीडामंत्री नवज्योत सिंह सिद्दू सह अनेक आमदारांना भेटूनही त्याला हवा तो प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही बलबीर व्यक्त करतो. त्याला 2019 मध्ये आबुदाबीत होणाऱ्या विशेष ऑलिम्पीकमध्ये सहभागी व्हायचे आहे. पण, त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. ती कशी पूर्ण होणार हीच खरी समस्या बलबीरसमोर आहे.