मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड आज 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईमध्ये सुरू आहे. इंग्लंड संघानं 578 धावांचा डोंगर उभारून भारतीय संघासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. सध्या भारतीय संघाकडून ह्या सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्याच दिवशी इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची आठवण या कसोटी सामन्याच्या निमित्तानं झाल्याशिवाय राहात नाही. त्यानिमित्तानं पुन्हा आज त्या दिवसाची आठवण होत आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी दिल्लीत 1999 रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान झालेल्या कसोटी सामन्यामध्ये 10 विकेट्स घेऊन इतिहास रचला होता. 


कसोटी सामन्यात 10 विकेट्स घेण्याचा विक्रम दिग्गज स्पिनर अनिल कुंबळे यांनी रचला होता. दिल्लीत 1999 मध्ये  फिरोजशाह कोटला मैदानावर कुंबळे यांनी पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात 10 गडी बाद करत यशस्वी कामगिरी केली होती. 


कसोटी डावात 10 बळी घेणारा आणि पहिला भारतीय कुंबळे हे दुसरे गोलंदाज ठरले. त्याआधी जिम लेकरने कसोटी डावात 10 गाडी बाद केले होते. कुंबळे यांनी सामन्याच्या पहिल्या डावात 04 विकेट्स घेतल्या आणि नंतर 10 अशा पूर्ण कसोटी सामन्यामध्ये मिळून 14 विकेट्स घेत मॅन ऑफ द मॅच ठरले होते.


भारतीय संघानं पहिल्यांदाच 252 धावा करून पाकिस्तानला हरवलं. तर दुसरा सामना ड्रॉ होणार का याची भीती सर्वांनाच होती. मात्र हा सामना ड्रॉ न होऊ देता अनिल कुंबळे यांनी आपल्या गोलंदाजीनं अख्खा खेळच पलटवला. 10 गडी बाद करत त्यांनी सर्व पाकिस्तान संघाला तंबूत धाडले होते.


सायकल चालवताना काळाचा घाला, या माजी वेगवान गोलंदाजाचा मृत्यू


अनिल कुंबळे यांच्या नावावर आतापर्यंत 132 कसोटी सामन्यांमध्ये 619 विकेट्स तर 271 वन डे सामन्यात 337 विकेट्स आहेत. त्यांच्या या तुफान गोलंदाजीपुढे 7 फेब्रुवारी 1999 मध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्यात पाकिस्तानला हार मानावी लागली होती.