मुंबई: वेगवान गोलंदाजवर काळानं घाला घातला आहे. एबीसी महामार्गावर सायकल चालवायला गेले असताना अचानक कारनं धडक दिली. या कारच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या जाण्यानं क्रिकेटविश्वात पोकळी निर्माण झाली आहे. या माजी वेगवान गोलंदाजाचं वय 63 वर्ष होतं. सायकल आणि कारच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे.
वेस्टइंडिजचे माजी वेगवान गोलंदाज एजरा मोसले यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ते 63 वर्षांचे होते. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला मोसलीने वेस्ट इंडिजकडून 2 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने त्यांनी खेळले होते.
वेस्ट इंडिजचे क्रिकेट दिग्दर्शक जिमी अॅडम्स यांनी मोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
त्याच्या फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 76 सामने खेळले तर त्या सामन्यांमध्ये 279 विकेट्स घेतल्या. तर लिस्ट ए यादीमधील सामन्यांमध्ये 102 विकेट्स घेण्यात यश आलं होतं.
वेगवान गोलंदाज एजरा मोसले यांनी 1990 मध्ये इंग्लंडविरुद्ध विव्हियन रिचर्ड्सच्या नेतृत्वात मोसेलीने दोन कसोटी सामने खेळले. या दोन सामन्यात त्यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीनं 6 गडी बाद केले. त्यांच्या वेगवान गोलंदाजीची त्यावेळी जगभरात चर्चा झाली.
पाठीच्या समस्येमुळे उत्तम कामगिरी करूनही त्यांना काही वर्षे क्रिकेटपासून दूर रहावं लागलं. वयाच्या 32 व्या वर्षी एजरा मोसले यांना कसोटी सामन्यातून पुन्हा पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
एजरा यांची त्यांच्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत होते. एकाच डावात सर्वाधिक गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज अशी त्यांची चर्चा होती. असा वेगवान गोलंदाज गमवल्यानं क्रिकेटविश्वात पोकळी निर्माण झाली आहे.