IPL मध्ये `या` सुंदर महिला अँकरचं कमबॅक; 2 वर्षांपासून होती ऑफ स्क्रिन
जवळपास 2 वर्षांनी ही महिला आयपीएलचं अँकरींग करताना दिसणार आहे.
मुंबई : 26 मार्चपासून यंदाच्या आयपीएलच्या सिझनला सुरुवात होणार आहे. आयपीएल फेमस होण्यामागे एक कारण आहे ते म्हणजे ग्लॅमर. मात्र यावर्षीच्या आयपीलएलचा ग्लॅमर अजूनच वाढणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये फॅन्सच्या आवडत्या अँकरचं कमबॅक होणार आहे. जवळपास 2 वर्षांनी ही महिला आयपीएलचं अँकरींग करताना दिसणार आहे.
या महिला अँकरची IPLमध्ये एंन्ट्री
गेल्या 2 वर्षांपासून स्क्रिनवर न दिसणारी मयंती लँगर आता पुन्हा एकदा आयपीएलचं अँकरींग करताना दिसणार आहे. मयंती आयपीएलमध्ये ग्लॅमरचा तडका देण्यासाठी तयार आहे. मयंती अनुभवी टेलिव्हिजन अँकर असून क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नची पत्नी आहे. 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार स्पोर्ट्सच्या ब्रॉडकास्टिंग टीमचा भाग असणार आहे मयंती.
गेल्या 2 सिझनमध्ये मयंतीचा सहभाग नव्हता
मयंतीने स्वतः तिच्या ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. तिच्या लहान बाळामुळे गेल्या 2 वर्षांमध्ये मयंती अँकरीग करताना दिसली नाही. मयंतीचा फॅन फोलोविंग भरपूर आहे. मयंतीप्रमाणे, संजना गणेशन, तान्या पुरोहित आणि नेरोली मीडोज या महिला अँकर दिसतात.
26 मार्चपासून सुरु होणार आयपीएल
आयपीएल सुरु होण्यासाठी अवघे काहीच दिवस उरले आहेत. येत्या 26 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. सिझनचा पहिला सामना कोलकाता नाईड रायडर्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज असणार आहे. तर यंदाच्या सिझनची फायनल 29 मे रोजी खेळली जाणार आहे.