विजयानंतरही हैदराबादच्या डोक्याला ताप, लागोपाठ दुसरा खेळाडू बाहेर
हैदराबाद टीमने सलग दुसरा सामना जिंकला. याचा आनंद केनची टीम साजरा करत असतानाच दोन मोठे धक्के टीमला मिळाला.
मुंबई: हैदराबाद टीमने सलग दुसरा सामना जिंकला. याचा आनंद केनची टीम साजरा करत असतानाच दोन मोठे धक्के टीमला मिळाला. कॅप्टन केनच्या टीमची गाडी रुळावर येत असतानाच डोक्याला ताप झाला. टीममधील दोन खेळाडू बाहेर झाले आहेत. पुढच्या सामन्यात ते खेळण्याची शक्यता फार धूसर दिसत आहे.
राहुल त्रिपाठीपाठोपाठ आता हैदराबादचा घातक बॉलर वॉशिंगटन सुंदर देखील बाहेर गेला आहे. त्यामुळे कॅप्टन केनचं टेन्शन वाढलं आहे. हैदराबादमधील 2 खेळाडू बाहेर होत असल्याने केनच्या डोक्याला ताप झाला आहे.
वॉशिंग्टन सुंदरने 3 ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या होत्या. हैदराबाद टीममध्ये सर्वात चांगली कामगिरी करणारा बॉलरच बाहेर झाल्यानं टीमच्या डोक्याला ताप झाला आहे.
वॉशिंग्टन सुंदरच्या अंगठ्यासह बोटाला दुखापत झाली आहे. ही दुखापत दोन ते तीन दिवस पाहावी लागणार आहे. त्यानंतर तो मैदानात खेळू शकेल की नाही याबाबत अधिक स्पष्टीकरण टीमकडून येऊ शकतं. त्याला पूर्ण फिट होण्यासाठी साधारण एक आठवडाही लागू शकतो.
शुक्रवार आणि रविवार हैदराबादचा कोलकाता आणि पंजाब विरुद्ध सामना आहे. या दोन्ही सामन्यासाठी वॉशिंग्टन सुंदर टीममध्ये उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे केनसाठी हा मोठा धक्का आहे. याचा फटका टीमच्या चांगल्या फॉर्मवर होण्याची शक्यता आहे.