चेन्नई : ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) च्या दमदार खेळामुळे  रॉयल चैलेंजर्स बैंगलोरची टीम ने बुधवारी झालेल्या आईपीएल मॅचमध्ये सनराइजर्स हैदराबादला 6 धावांनी हरवले. मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 41बॅालमध्ये 59 धावांच्या जोरावर आरसीबी ने 8 विकेटवर 149 धावा बनवल्या. त्यानंतर सनराइजर्सचा संघ 20 ओव्हरनध्ये 9 विकेटवर 143 धावांवर पोहचला आणि कोहलीचा संघ 6 धावांनी विजयी झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चैलेंजर्स बंगलोरला (आरसीबी)जिंकून दिल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल ने  आपली जुनी टीम किंग्ज इलेवन पंजाबवर निशाना साधला. ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) च्या म्हण्यानुसार आरसीबीच्या टीममध्ये आल्यानंतर त्याला खेळण्यासाठी खूप स्वातंत्र्य मिळाले, जे त्याला आधीच्या टीममध्ये मिळाले नव्हते. मॅक्सवेलने आपल्या आधीची चीन म्हणजेच पंजाब किंग्ज वर नाव न घेता निशाना साधला. पंजाबच्या संघात मॅक्सवेल पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी उतरत होता, परंतु यावेळी बँगलोरने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्याला नंबर 4 वर खेळायला उतरवले आहे.


बंगलोरच्या टीम मध्ये मॅक्सवेल आनंदी


रॉयल चैलेंजर्स बंगलोरच्या टीममध्ये 4 नंबरवर खेळायला मिळाल्यामुळे मॅक्सवेलला खूप आनंद झाला आहे. मॅक्सवेल ने सांगितले, "रॉयल ​​चैलेंजर्स बँगलोरने मला स्पेशल रोल दिला आहे. जेव्हा तुमच्या मागे एबी डिव्हिलीयर्स सारखा खेळाडू बॅटिंग करणार असतो त्यामुळे तुमच्यावर खेळण्याचे प्रेशर येत नाही. तुम्हाला खेळायला आजादी मिळते. हाच रोल माझा ऑस्ट्रेलियाच्या संघात देखील आहे."


जिंकल्यानंतर मॅक्सवेलची प्रतिक्रिया


ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell)  पुढे सांगितले, 'रॉयल ​चैलेंजर्स बँगलोर' च्या टीमने मला नेहमीच सपोर्ट केला आहे. मला फक्त माझ्या अनुभवाचा उपयोग करायचा होता. या परिस्थितीत मला फक्त रन बनवायचे होते. माझ्या मागे चांगले खेळाडू असल्यामुळे मला खेळायला मिळत आहे." पुढे मॅक्सवेल (Glenn Maxwell) म्हणाला, "आरसीबीही माझी चौथी आयपीएल टीम आहे आणि म्हणूनच माझावर दबाव सुद्धा आहे. म्हणूनच माझ्यासाठी चांगला खेळ दाखवने तितकेच महत्वाचे आहे."