पुणे : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 5 वा सामना हैदराबाद विरुद्ध राजस्थान झाला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता. हैदराबाद टीमसाठी पहिल्या सामन्याची सुरुवात अत्यंत वाईट झाली. मात्र दोन्ही टीमच्या खेळाडूंची किंवा त्यांच्या खेळाची इतकी चर्चा झाली नाही इतकी सनरायझर्स हैदराबादच्या मालकीणीची होताना दिसतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, टीमची मालकीण काव्या सनरायझर्स हैदराबादला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती. त्या सामन्यादरम्यान रोमॅरियो शेफर्डने सामन्याच्या सातव्या ओव्हरमध्ये आरआरचा सलामीवीर यशस्वी जैस्वालला बाद केलं तेव्हा काव्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.


यावेळी काव्या मारन तिच्या खुर्चीवरून उठली आणि हसत आनंदाने टाळ्या वाजवू लागली. दरम्यान काव्याच्या या रिएक्शनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घालतोय.



सनरायझर्स हैदराबादच्या पराभवापेक्षाही टीमची मालकीण काव्या हेडलाईन्स दिसतेय आहे. याआधीही तिने अशाच प्रकारे चाहत्यांची मनं लुटली होती. काव्या आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये देखील आली होती. त्यानंतर तिचा चाहता वर्ग वाढू लागला.


राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात राजस्थान रॉयल्सने हैदराबादचा पराभव केला. राजस्थानने हैदराबादचा 61 धावांनी पराभव करत या सिझनमधील पहिला सामना जिंकला. तर दुसरीकडे टीमचा कर्णधार केन विलियम्सनला स्लो ओव्हर टाकल्याने 12 लाखांचा दंडही बसला आहे.