Asia Cup 2022 Womens: आशिया कप 2022 महिला स्पर्धेच्या (Asia Cup 2022 Womens) अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका (India Vs Sri Lanka) यांच्यात सामना होणार आहे. श्रीलंकेने पाकिस्तान संघावर अवघ्या एका धावेने मात करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. श्रीलंकेनं पाकिस्तानविरुद्ध 6 गडी गमवून 122 धावा केल्या आणि विजयासाठी 123 धावांचं आव्हान दिलं. मात्र पाकिस्तानचा संघ 6 गडी गमवून 121 धावा करू शकला. शेवटच्या चेंडूवर पाकिस्तान 3 धावांची आवश्यकता होती. पाकिस्तानच्या निदा दारनं चेंडू तटावला देखील मात्र दुसरी धाव घेतला धावचीत झाली. त्यामुळे श्रीलंकेनं हा सामना अवघ्या एका धावेने जिंकला. अंतिम फेरीचा सामना 15 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरुद्ध थायलँड उपांत्य फेरी


भारतानं उपांत्य फेरीत (Team India) थायलँड संघाचा (Team Thailand) 74 धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीच्या सामन्यात थायलँडनं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 गडी गमवून 148 धावा केल्या आणि विजयासाठी 149 धावांचं आव्हान दिलं. थायलँड संघ 20 षटकात 9 गडी गमवून 74 धावाच करू शकला. 



श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान उपांत्य फेरी


उपांत्य फेरीत श्रीलंकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 20 षटकात 6 गडी गमवून 122 धावा केल्या आणि विजयासाठी 123 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. शेवटच्या चेंडूवर पाकिस्तान 3 धावा हव्या होत्या. मात्र निदा दारनं अचिनी कुलासुरियाच्या गोलंदाजीवर चेंडू मारला. मात्र दुसरी धाव घेताना निदा दार पोहोचली नाही आणि एका धावेने पराभव सहन करावा लागला.