कोलंबो : निदहास ट्रॉफी स्पर्धेत श्रीलंका आणि बांगलादेशसाठी आज करो वा मरोचा सामना आहे. या स्पर्धेत भारताने आधीच फायनलमध्ये मजल मारलीये त्यामुळे बांगलादेश अथवा श्रीलंका यापैकी जो संघ जिंकेल तो संघ फायनल गाठेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही संघाकडे एका विजयासह प्रत्येकी दोन दोन गुण आहेत. श्रीलंकेने पहिल्या सामन्यात भारताला हरवले होते. त्यानंतर बांगलादेशने श्रीलंकेला सहजरित्या हरवले. 


तिसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशला सहा विकेटनी हरवले. यामुळे तिनही संघाकडे प्रत्येकी दोन गुण झाले होते. त्यानंतर भारताने बांगलादेश आणि श्रीलंकेला हरवत फायनल गाठली.


बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास यजमान संघाला रनरेटचा फायदा होऊ शकतो. त्याच्या जोरावर ते फायनलमध्ये पोहोचू शकतात. 


बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेचा सध्याचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यांनी बांगलादेशला कसोटी आणि टी-२० सीरिजमध्ये हरवलेय. यासोबत झिम्बाब्वेसोबतच्या ट्राय वनडे सीरिजसच्या फायनलमध्येही विजय मिळवला. 


या सामन्यात श्रीलंकेचा नियमित कर्णधार दिनेश चंडीमलची कमी जाणवेल. त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आलीये. 


सामन्याची वेळ : संध्याकाळी ७ वाजता.