श्रीलंका क्रिकेट बोर्ड सस्पेंड, वर्ल्डकपमध्ये टीमच्या खराब कामगिरीवरून घेतली एक्शन
Sri Lanka’s national cricket board sacked : विश्वचषक स्पर्धेत भारताकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी सोमवारी राष्ट्रीय क्रिकेट बोर्ड बरखास्त केला.
Sri Lanka’s national cricket board sacked : चालू विश्वचषक स्पर्धेत यजमान भारताकडून राष्ट्रीय संघाचा दारुण पराभव झाल्यानंतर सरकारने सोमवारी श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केला.2 नोव्हेंबर रोजी मुंबईत भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला. भारताच्या या विजयानंतर श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी शम्मी सिल्वा यांच्या नेतृत्वाखालील श्रीलंका क्रिकेट बोर्डला राजीनामा देण्याचे आवाहन केल्यानंतर ही कारवाई झाली.
पराभवानंतर सिल्वा प्रशासनाच्या राजीनाम्याची मागणी करत एसएलसी परिसरासमोर अनेक निदर्शने करण्यात आली.इमारतीच्या सुरक्षेसाठी दंगल पोलिस तैनात करण्यात आले होते.क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी माजी विश्वचषक विजेत्या कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय अंतरिम समिती नेमली होती.
क्रीडा मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की रणसिंगे यांनी 1973 च्या क्रीडा कायदा क्रमांक 25 च्या अधिकारांतर्गत समितीची नियुक्ती केली. या समितीमध्ये तीन निवृत्त न्यायाधीश आहेत, त्यापैकी दोन महिला आणि SLC चे माजी अध्यक्ष उपली धर्मदासा यांचा समावेश आहे.