SL Player Suspended For Sexual Assault : ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अतिम टप्प्यात पोहोचलाय. काल रविवारीच सुपर 12 चे सर्व सामने पार पडले आहेत. आता सेमी फायनलची (Semi final) लढत येत्या बुधवारपासून सुरु होणार आहे. या सामन्यापुर्वीच क्रिकेट विश्वातली सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध क्रिकेटरवर निलंबनाची (cricketer Suspend) कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान हा क्रिकेटर कोण आहे ? व त्याला निलंबित का करण्यात आले आहे? हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : IND vs PAK फायनलची वाट पाहतोय 'हा' दिग्गज क्रिक्रेटर 


क्रिकेटरचं निलंबन 


ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमधून (T20 World Cup) श्रीलंका बाहेर पडला आहे. याच श्रीलंका संघात असलेल्या सलामीवीर दानुष्का गुणथिलाकावर (Danushka Gunathilaka) ऑस्ट्रेलियात बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri lanka cricket Board) त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. म्हणजेच यापुढे बलात्कार प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळता येणार नाही.


हे ही वाचा : भारत-पाकिस्तान महामुकाबल्यापुर्वी 'या' खेळाडूने घेतला संन्यास


क्रिकेट बोर्डाच निवेदन काय? 


श्रीलंका क्रिकेटने (Sri lanka cricket Board) या प्रकरणी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले की,"दानुष्का गुणथिलाका (Sri lanka cricket Board) याच्यावर ऑस्ट्रेलियात एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे, त्याला अटक करण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावर श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने निर्णय घेतला आहे की, तो क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात निवडीसाठी पात्र मानला जाणार नाही.


श्रीलंका क्रिकेट या आरोपाची चौकशी करण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलेल आणि ऑस्ट्रेलियन न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात खेळाडू दोषी आढळल्यास त्याला शिक्षा होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.


प्रकरण काय? 


सिडनी पोलिसांनी रविवारी पहाटे श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाकाला (Sri lanka cricket Board) अटक केली. एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर गुनाथिलकाला सिडनी पोलिसांनी टीम हॉटेलमधून अटक केली होती. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे अनेक दिवसांच्या संभाषणानंतर दोघांची भेट झाली. 2 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी दानुष्काने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. ही घटना 'रोझ बे' या महिलेच्या निवासस्थानीच घडली. क्राईम सीनची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी ३१ वर्षीय दानुष्काला सिडनीतील ससेक्स स्ट्रीटवरील हॉटेलमधून अटक केली आहे. 


दरम्यान य़ा आरोपांमुळे दानुष्का गुणथिलाका (Sri lanka cricket Board) अडचणीत सापडला आहे. आता या प्रकरणात तो दोषी आढळतो, कि त्याच्यावर आरोप सिद्ध होतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.