Sport News : टी-20 वर्ल्डकपमधील श्रीलंका आणि अफगाणिस्तानमधील सामन्यामध्ये लंकेने विजय मिळवला आहे. या विजयासह अफगाणिस्तान संघाला श्रीलंकेने घरचा रस्ता दाखवला आहे. पॉईंट टेबलमध्येही श्रीलंकेच्या संघाने आघाडी घेतली असून इंग्लंडला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तान संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर गुरूबाज 28 धावा आणि उस्मान गणी 27 धावा यांनी 42 धावांची खेळी करत चांगली सुरूवात केली. लाहिरू कुमाराने पहिलं यश मिळवून दिलं त्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंमध्ये मोठी भागाीदारी झाली नाही. काही अंतराने गडी बाद होत गेले आणि अफगाणिस्तानने 145 धावांचं लक्ष्य श्रीलंकेसमोर ठेवलं.  श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने सर्वाधिक 3 तर लाहिरू कुमाराने 2 गडी बाद केले. 


अफगाणिस्तान संघाने  दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात निराशाजनक झाली. रहमानने सलामीवीर निसांकाला 10 धावांवर माघारी पाठवलं. मात्र धनंजय डिसिल्वाने नाबाद 66 धावांची खेळी केली. असालंका 19 धावा आणि राजपक्षे यांनी 18 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून राशिद खान, मुजीर रहमान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. 


दरम्यान, अफगाणिस्तानची बॉलिंग आणि बॅटींग चालली नाही त्यामुळे संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या पराभवासोबत अफगाणिस्तानचा संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आता ग्रुप A मध्ये उपांत्य फेरीसाठी मोठी स्पर्धा रंगली आहे.