डर्बी : महिलांच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या चौथ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून श्रीलंकेसमोर २३३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.  भारताकडून दीपाली शर्मा आणि कर्णधार मिथाली राज यांनी अर्धशतकी खेळी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सिरीजमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करू मागील तीनपैकी दोन सामने जिंकले आहे. त्यामुळे भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  या २३२ धावांमध्ये दीपाली शर्माने ११० चेंडूत १० चौकारांसह ७८ धावा केल्या.  तर चांगल्या फॉर्मात असलेल्या कर्णधार मिथाली राजहिने ७८ चेंडूत  ४ चौकार ५३ धावा केल्या. 


श्रीलंकेकडून श्रीपलीने ३ विकेट घेतल्या. तर रणविराने दोन, गुणरत्ने आणि कांचना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.