मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेला झटके
भारतानं ठेवलेल्या ४१० रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या बॅट्समनची दाणादाण उडाली आहे.
नवी दिल्ली : भारतानं ठेवलेल्या ४१० रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या बॅट्समनची दाणादाण उडाली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्ह श्रीलंकेनं ३१ रन्सच्या मोबदल्यात ३ विकेट गमावल्या आहेत. रवींद्र जडेजानं श्रीलंकेच्या दोन तर शमीनं एका बॅट्समनला आऊट केलं. पाचव्या दिवशी श्रीलंकेला विजयासाठी आणखी ३७९ रन्सची आवश्यकता असणार आहे.
चौथ्या दिवसाची सुरुवात ३५६/९ अशी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव ३७३ रन्सवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताला १६३ रन्सची आघाडी मिळाली. या इनिंगमध्ये इशांत शर्मा आणि अश्विननं प्रत्येकी तीन तर मोहम्मद शमी आणि जडेजानं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या भारतानं २४६/५वर डाव घोषित केला आहे. यामुळे श्रीलंकेला विजयासाठी ४१० रन्सचं आव्हान मिळालं.
तिसऱ्या इनिंगमध्ये भारताकडून शिखर धवननं ६७ रन्स केल्या तर विराट कोहली ५० रन्सवर आऊट झाला, रोहित शर्मा ५० रन्सवर नाबाद राहिला. या सीरिजमध्ये अपयशी ठरलेला अजिंक्य रहाणेला या इनिंगमध्येही मोठा स्कोअर करता आला नाही. अजिंक्य रहाणे १० रन्सवर आऊट झाला. या सीरिजमधला अजिंक्य रहाणेचा हा पहिला दोन अंकी स्कोअर आहे.