VIDEO : श्रीलंका टीममध्ये वेगळ्या बॉलिंग अॅक्शनचा नवा खेळाडू
श्रीलंका टीम याबाबतीत नेहमीच स्पेशल टीम राहिली आहे. या टीमने नेहमीच अनआर्थोडॉक्स स्पिनर मैदानात उतरवले आहेत.
नवी दिल्ली : श्रीलंका टीम याबाबतीत नेहमीच स्पेशल टीम राहिली आहे. या टीमने नेहमीच अनआर्थोडॉक्स स्पिनर मैदानात उतरवले आहेत. आता पुन्हा एकदा श्रीलंका क्रिकेट टीममध्ये एका नव्या खळबळ उडवून देणा-या खेळाडूची एन्ट्री झाली आहे. १८ वर्षीय लेग स्पिनर केविन कोथिगोडा असं त्याचं नाव आहे. केविन सध्या मलेशियामध्ये अंडर १९ टीमचा भाग आहे. तो सध्या युवा एशिया कप खेळत आहे. या आठवड्यात श्रीलंकाने अफगाणिस्तान विरूद्ध ६१ रन्सचा महत्वपूर्ण विजय केविनच्या मदतीने मिळवला.
केविनच्या गोलंदाजीची अॅक्शन दक्षिण आफिक्रेच्या पॉल अॅडम्ससारखीच आहे. माजी गोलंदाज पॉल डाव्या हाताचा चायनामॅन गोलंदाज होता. केविन ह उजव्या हाताने तशीच गोलंदाजी करतो. अफगाणिस्तान विरूद्ध मिळवलेल्या विजयात केविनने एक विकेट घेतली होती. श्रीलंका ए टीमचा माजी ओपनर धमिका सुदर्शनने रिचमोंड कॉलेजमध्ये केविनला तयार केलंय.