दुबई : आशिया कपचा (Asia cup 2022) प्रमुख दावेदार असलेल्या बलाढ्य पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंकेने (SL vs PAK) सहाव्यांदा आशिया कपवर नाव कोरले. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या श्रीलंकेसाठी हा सर्वांत मोठा विजय होता. या फायनल सामन्यातील अनेक गोष्टी चर्चेत राहील्या. मात्र सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरलेली गोष्ट म्हणजे भारतीय फॅन्ससोबत झालेलं गैरवर्तन. नेमकं या घटनेत भारतीय फॅन्ससोबत (Indian Fans) काय झालंय ते जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान-श्रीलंका (SL vs PAK) यांच्यातील आशिया कपच्या (Asia cup 2022) फायनल सामन्याची सर्वांनाच उत्सुकता होती. भारतीय फॅन्स देखील या सामन्यासाठी उत्सुक होते. यासाठी अनेक भारतीय फॅन्स इंडियन जर्सी घालून हा सामना पाहण्यासाठी दुबईच्या स्टेडीअमवर पोहोचले होते. मात्र या भारतीय फॅन्सना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे भारतीय फॅन्ससोबत हे मोठं गैरवर्तन झालं. 


जगभरात भारतीय खेळांचा समर्थक गट म्हणून चर्चेत असलेली द भारत आर्मी (The Bharat Army), टीम इंडियाचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक दौऱ्यात दाखल होत असते. आशिया कपसाठी (Asia cup 2022) देखील ही आर्मी दुबईत दाखल झाली होती. मात्र भारतीय क्रिकेट संघाला आशिया कपच्या अंतिम फेरीत खेळताना पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. रोहित शर्माचा संघ अंतिम फेरीत पोहोचण्याआधीच स्पर्धेतून बाहेर पडला होता. साहजिकच भारतीय चाहत्यांसाठी यापेक्षा निराशाजनक काहीही असू शकत नाही. 


असे असूनही देखील खेळाचा आनंद लुटण्यासाठी द भारत आर्मी (The Bharat Army) आशिया कपचा (Asia cup 2022) फायनल सामना पाहण्यासाठी दुबईच्या स्टेडीअमवर पोहोचली होती. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना इंडियन जर्सी घालून स्टेडिअममध्ये प्रवेश नाकारला. तसेच त्यांना इतर दोन्ही संघाची जर्सी घालून प्रवेश करण्याच्या सुचना दिल्या. द भारत आर्मी यांना स्टेडिअममध्ये मिळालेल्या वागणुकीमुळे चाहत्यांची निराशा झालीय. तसेच भारतीय फॅन्सना स्टेडिअमवर मिळालेल्या वागणूकीमुळे संताप व्यक्त होतेय. या संपुर्ण घटनेचा उलगडा करणारा व्हिडिओ द भारत आर्मीने पोस्ट केला आहे. 



दरम्यान या घटनेनंतर आता हा प्रश्न उभा ठाकला जातोय की, आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट काऊन्सिल, टूर्नामेंटचे आयोजक यांच्याकडून अशा काही सूचना देण्यात आल्या आहेत का? जर अशा सूचना आहेत, तर याची कल्पना फॅन्सना देण्यात आली होती का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.  


घटनेच्या चौकशीची मागणी
आता याप्रकरणी आयसीसी (ICC) आणि एसीसीकडून (Asia cricket Council) हस्तक्षेप करण्याची आणि चौकशीची मागणी चाहत्यांनी केली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह आहेत, जे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देखील आहेत. अशा स्थितीत भारतीय चाहत्यांनी जय शाह (Jay shah) यांना या प्रकरणात हस्तक्षेप करून कारवाईची मागणी केली आहे.