नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये दररोज काहीतरी वेगळा रेकॉर्ड झाल्याचं आपल्याला पहायला मिळतं. मात्र, आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हीही हसून-हसून लोटपोट व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


श्रीलंकेचा बॅट्समन चमारा सिल्वा याने एका स्थानिक मॅचमध्ये एक वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा शॉट खेळणं त्याच्याच अंगाशी आल्याचं पहायला मिळालं.


श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये एमएएस यूनीशेला आणि तीजे लंका या टीम्समध्ये मॅच सुरु होती. या मॅचमध्ये चमारा सिल्वा हा बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र, अचानक असं काही झालं की तो शॉट खेळण्यासाठी विचित्रच प्रकार केला.


हा शॉट खेळण्यासाठी चमारा नाही पुढे आला, नाही स्वीप केला तर चक्क स्टंम्पच्या मागेच गेला.


झालं असं की, त्याला पुल शॉट खेळायचा होता मात्र, बॉलरने सरळ बॉल टाकला. त्यामुळे चमाराने बॉल खेळण्यापूर्वी बॉल स्टम्पला धडकला.



चमारा वेगळा शॉट खेळण्याच्या नादात आऊट झाला आणि पेवेलियनमध्ये परतला.


गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात स्थानिक मॅचेस खेळताना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी चमारा सिल्वा याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.