या क्रिकेटपटूंना लज्जास्पद वर्तन पडणार महागात, त्यांच्यावर 2 वर्षांची बंदी घातली जाऊ शकते
इंग्लंड दौऱ्यावर लज्जास्पद वर्तन केले. त्यामुळे याक्रिकेटपटूंवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
मुंबई : श्रीलंकेचे (Sri Lanka) क्रिकेटपटू (Cricketers) निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) आणि कुशल मेंडिस (Kusal Mendis) यांनी इंग्लंड दौऱ्यावर लज्जास्पद वर्तन केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांना दोन वर्षांकरिता निलंबित करण्यात आले. आता या खेळाडूंच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.
श्रीलंकेच्या खेळाडूंना ही मोठी शिक्षा
श्रीलंका क्रिकेटच्या पाच सदस्यीय शिस्तपालन समितीने दौर्यादरम्यान जैव-सुरक्षित वातावरणाचे उल्लंघन केल्याबद्दल फलंदाज धनुष्का गुंटीलाका आणि कुसल मेंडिसवर दोन वर्षांच्या बंदीची आणि यष्टीरक्षक निरोशन डिकवेला याच्यावर 18 महिन्यांच्या बंदीची शिफारस केली आहे.
याशिवाय त्याच्यावर 25,000 डॉलरचा दंडही लावण्यात आला आहे. जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी या तिघांनी डरहममध्ये कोविड संरक्षणासाठी तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन केले होते.
एसएलसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की समितीच्या शिफारशींना एसएलसी कार्यकारिणीकडून मान्यता देण्यात आलेली नाही. मात्र, याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
खेळाडूंनी हे लज्जास्पद कृत्य केले
वास्तविक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात कुसल मेंडिस याच्या हातात काही मादक पदार्थ दिसला असून तो निरोशन डिकवेला यांच्याबरोबर गुप्तपणे घेण्याचा प्रयत्न करताना दिसला. हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांचा राग सोशल मीडियावर पसरला.
त्यानंतर तिघांनाही तात्काळ निलंबित करुन घरी पाठवण्यात आले. एक सदस्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय शिस्तपालन समितीने तिघांनाही दोषी ठरवले आहे.