लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारताविरुद्धच्या मॅचमध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.  या मॅचमध्ये भारताच्या संघामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याआधीचा सामना जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे, त्यामुळे विराट सेना कोणत्याही दडपणाशिवाय मैदानात उतरेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याउलट श्रीलंकन वाघांची अवस्था मात्र काहीशी बिकट आहे. श्रीलंकेला आपल्या पहिल्याच मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून 96 रन्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यातच दुखापतीमुळे पहिल्याच मॅचला मुकणारा श्रीलंकन कॅप्टन अँजेलो मँथ्यूज भारताविरोधात खेळणार का याबाबत सस्पेन्स आहे.


आफ्रिकन बॅट्समन्सनी श्रीलंकन बॉलर्सची धुलाई करत तीनेशहून अधिक रन्स काढले होते. त्यामुळे मलिंगा व्यतिरिक्त फारसा अनुभव नसणा-या लंकन बॉलर्सचा भारतीय बॅट्समनपुढे कस लागणार आहे. ही मॅच जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित करण्याची भारताला संधी आहे.


असा आहे भारतीय संघ


रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, जसप्रीत बुमराह