Nathan Lyon, Eng Vs Aus: सध्या लॉर्डस् क्रिकेट ग्राऊंडमध्ये (Lord's, London) सुरू असलेल्या अॅशेस मालिकेच्या मध्यावर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसलाय. अनुभवी ऑफस्पिनर नॅथन लियॉन याला दुसऱ्या कसोटीदरम्यान (England vs Australia) दुखापत झाली. त्यामुळे आता तो संपूर्ण मालिका खेळू शकणार नाही. हॅमस्ट्रिंगच्या ताणामुळे लियॉनने मैदानात उतरणार नाही, असं ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, आता नॅथन लियॉन (Nathan Lyon) टीमच्या मदतीला धावून आला आहे. काल कुबड्यांवर चालत असलेला लियॉन आज टीमसाठी मैदानात बॅट घेऊन उतरला. त्याला मैदानात येताना पाहून सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं स्वागत केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने दिलेल्या स्टेटमेंटनंतर लियोन उर्वरित तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्याचं मानलं जात आहे. मात्र, त्याने आज मैदानात उतरून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी तो कुबड्यांवर चालताना दिसला. सामन्यातील दुसरा डावात बॉल पकडण्याच्या प्रयत्नात तो जखमी झाला होता. 9 विकेट पडल्यावर ऑस्ट्रेलियाचा डाव संपला असं सर्वांना वाटत होतं. मात्र टीमचा स्कोर कमी झाला. त्यावेळी अचानक नॅथन लियॉन बॅट घेऊन मैदानात प्रकटला.


आणखी वाचा - वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यादांच असं घडलं!


ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. उस्मान ख्वाजा वगळता बाकी खेळाडू झटपट बाद झाले. हेझलवूडच्या रुपाने ऑस्ट्रेलियाची 9 वी विकेट गेली. बेन स्टोक्सने त्याचा पत्ता कट केला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा डाव संपला असं सर्वांना वाटत होतं. बेन स्टोक्स अँड कंपनी मैदान सोडण्याच्या तयारीत होती. त्याचवेळी लियॉनने मैदानात पाऊल ठेवलं. मैदानात पाहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत त्याचं स्वागत केलं. लियॉने स्टार्ससह मिळवून 15 धावा एक्ट्रा केल्या. त्यावेळी लियॉनला फक्त 4 धावा करता आल्या. तोही त्याने फोर मारला होता.


पाहा Video



दरम्यान, पहिल्या डावात कांगारूंनी मजबूत स्कोर उभा केला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 416 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडने 325 धावा केल्या. त्यामुळे 91 धावांची लीड ऑस्ट्रेलियाला मिळाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 279 धावा करत 371 धावांचं आव्हान इंग्लंडसमोर ठेवलं आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार इंग्लंडने दुसऱ्या डावात आत्तापर्यंत 35 धावा केल्या कसून 2 गडी बाद झाले आहेत. त्यामुळे आता इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी 336 धावांची गरज आहे. आता उद्या आणि शेवटच्या दिवशी इंग्लंड कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.