बापरे! हा इतका फिट कसा? -20 अंशांच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत Cristiano Ronaldo चं स्विमिंग, पाहा Video
Cristiano Ronaldo Video : चहूबाजूंनी बर्फ अन त्याच बर्फाच्या पाण्यात पोहायला उतरला रोनाल्डो; हा इतका फिट कसा? पाहणाऱ्यांनाही पडला प्रश्न
Cristiano Ronaldo Video : जागतिक ख्यातीचा फुटबॉलपटू म्हणून ओळखला जाणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो कायमच त्याच्या खेळानं आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वानं अनेकांना बारावून सोडतो. खेळाच्या वर्तुळापलिकडेसुद्धा रोनाल्डो कायमच त्याच्या कुटुंबासह चाहत्यांनाही आनंद देण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं. मग ते सांताक्लॉज बनून चाहत्यांना थक्क करणं असो किंवा आणखी एखादी पद्धत असो. सध्या हाच रोनाल्डो चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्याचा व्हायरल होणारा एक व्हिडीओ.
सुट्ट्यांचा माहोल सुरू असून, सामान्यांसमवेत सेलिब्रिटी मंडळीसुद्धा या दिवसांमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. रोनाल्डोसुद्धा यात मागे नाही. सध्या तो कुटुंबासमवेत सहलीवर गेला असून, हा पोर्तुगालचा स्टार खेळाडू चाहत्यांना त्याच्या फिटनेसनं हैराण करत आहे.
Lapland मध्ये गेलेल्या रोनाल्डोनं नुकतंच स्वत:च्याच शरीराला आव्हान देत चक्क -20 अंश सेल्सिअस इतक्या थंड पाण्यात स्विमिंग केलं. पाण्यात उतरण्यापूर्वीचा त्याचा उत्साह पाहण्याजोगा असून, तो जसजसा पाण्यात उतरत आहे, तसतसं पाणी नेमकं किती थंड आहे याचा अंदाज येत आहे. बरं, हे पाणी इतकं थंड असतानाही त्यावर “just a little cold.” अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आणि व्हिडीओ पाहणारे हैराण झाले.
रोनाल्डोडी पार्टनर जॉर्जिया आणि त्याचा मुलगा रॉड्रिग्ज तिथं या स्टार खेळाडूचं धाडस पाहताना भारावले असून, व्हिडीओ पाहणाऱ्या नेटकऱ्यांनीही या खेळाडूच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. Fitness activities च्या माध्यमातून आपली सुदृढता दाखवण्याची ही 39 वर्षी रोनाल्डोची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यानं अनेकदा व्यायाम करतानाचे आईस बाथचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत.
हेसुद्धा वाचा : अवघ्या 85 रुपयात घेतलेल्या घराच्या Interior वर तिने खर्च केले 3 कोटी रुपये... एकदा हे Before & After फोटो पाहाच
आश्चर्याची बाब म्हणजे रक्त गोठवणाऱ्या या थंड पाण्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळं शरीराची सूज कमी होण्यासोबतच कोणतीही इजा झाल्यास ती लवकरत बरी होते. याशिवाय मानसिक तणाव, नैराश्यही कमी होतं असं सांगितलं जातं.