मुंबई : आयपीएलचा अकरावा सिझन आता सोनीवर नाही तर स्टारवर दिसणार आहे. आयपीएलच्या लिलावामध्ये स्टार इंडियानं २०१८-२०२२ पर्यंत आयपीएलच्या मॅचचं भारतात प्रसारण करण्याचे अधिकार विकत घेतले आहेत. स्टार इंडियानं तब्बल १६,३४७.५० कोटी रुपयांना हे अधिकार विकत घेतले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल मॅचच्या प्रसारणासाठीच्या लिलावामध्ये स्टार आणि सोनी यांच्यामध्ये स्पर्धा होती पण यामध्ये स्टारनं बाजी मारली. स्टारला प्रसारणासोबतच मॅचचे डिजीटल अधिकारही देण्यात आले आहेत.


याआधी २००८मध्ये आयपीएलच्या प्रसारणासाठीचा लिलाव झाला होता. त्यावेळी सोनीनं ८२०० कोटी रुपये देऊन हे अधिकार विकत घेतले होते. पण आता स्टारनं एवढी मोठी रक्कम दिल्यामुळे आयपीएल फ्रॅन्चायजी मालकांनाही मोठा फायदा होणार आहे.