मुंबई : 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. भारत, वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने प्रारंभ करणार आहे. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या या सामन्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतोय. याच निमित्ताने स्टार स्पोर्ट्सने पुन्हा एकदा 'मौका-मौका' जाहिरातीचा प्रोमो रिलीज केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार स्पोर्ट्सने यासंदर्भात ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, तुम्हाला माहिती आहे भारत-पाक सामना आता काही फार दूर नाही. आशा आहे की तुम्ही या अपकमिंग जाहिरातीबद्दल तितकेच उत्सुक असाल!


पहिल्यांदा 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेदरम्यान, 'मौका-मौका' जाहिरातीने सर्वांच्या मनात घर केलं होतं. त्या काळात, स्टार स्पोर्ट्सने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याआधी एक संधीनुसार व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओने भारत आणि पाकिस्तानच्या करोडो क्रिकेट प्रेमींच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं होतं.


आयसीसी वर्ल्डपक 2019 च्या दरम्यानही, भारत-पाकिस्तान सामन्याआधी स्टार स्पोर्ट्सच्या मनोरंजक जाहिरातीने धुमाकूळ घातला होता. 



2021च्या टी -20 वर्ल्डकपसाठी भारताला पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानसह ग्रुप -2 मध्ये स्थान देण्यात आलं आहे. क्वालिफायर फेरीनंतर, त्यात ब ग्रुपतील विजेत्या संघाचा आणि गट अ मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचा समावेश असेल. दुसरीकडे, वेस्ट इंडीज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे गट -1 मध्ये आफ्रिकेचे संघ आहेत. क्वालिफायर टप्प्यानंतर, गट 'अ'चा विजेता संघ आणि गट 'ब'चा उपविजेता संघ जोडला जाईल.


टी 20 वर्ल्डकपच्या बाद फेरीचे सामने 10 नोव्हेंबरपासून सुरू होतील. स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी 10 नोव्हेंबरला तर दुसरी उपांत्य फेरी 11 नोव्हेंबरला खेळली जाईल. त्याचबरोबर अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. आयसीसीने 15 नोव्हेंबर हा अंतिम सामना राखीव दिवस म्हणून ठेवला आहे.