Australia vs South Africa Test  : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात (Australia vs South Africa 3rd Test) स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) मोठा रेकॉर्ड केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दमदार शतक ठोकत स्मिथने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज डॉन ब्रेडमन (Don Bradman) यांचा रेकॉर्ड मोडला आहे. स्टीव्ह स्मिथ असा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचा करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. (steve smith broke don bradman record record most centuries in test Australia  latest marathi sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मिथने कोणता रेकॉर्ड केलाय?
स्टीव्ह स्मिथने 192 चेंडूत 104 धावांची खेळी केली असून यामध्ये त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथने आफ्रिकेविरूद्ध कारकीर्दितील 30 वं शतक पूर्ण केलं आहे. डॉन ब्रॅडमन यांनी एकूण 29 शतके केली आहेत. स्टीव्ह स्मिथने 30 शतक पूर्ण करत लगेच बाद झाला. केशव महाराजने त्याला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. 


ऑस्ट्रेलियाकडून कसोटीमध्ये माजी कर्णधार रिकी पाँटिंगने सर्वाधिक 41 शतके केली आहेत. रिकी पाँटिंगनंतर दुसऱ्या स्थानावर स्टीव्ह वॉ यांनी 32 शतके केली आहेत. तिसऱ्या स्थानी 30 शतकांसह मॅथ्यू हेडन आणि स्टीव्ह स्मिथ आहेत. सर्वाधिक शतकांच्या यादीमध्ये  स्मिथ जगातील 15 वा खेळाडू ठरला आहे. 


कसोटीमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या यादीमध्ये सचिन तेंडुलकर 51 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानी जॅक कॅलिस 45, तिसऱ्या स्थानी रिकी पाँटिंग 41, चौथ्या स्थानी कुमार संगकारा 38 आणि पाचव्या स्थानी राहुल द्रविड 36 शतकांसह पाचव्या स्थानी आहे.


दरम्यान, आताच्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारा खेळाडू विराट कोहली आहे. कोहलीची एकूण 72 शतके असून त्यानंतर डेव्हिड वॉर्नर  45, जो रूट 44 आणि स्टीव्ह स्मिथ 42 शतकांसह चौथ्या स्थानी आहे.