Mohammed Siraj : कोलंबोमध्ये रविवारी झालेल्या एशिया कपच्या ( Asia cup 2023 ) अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेची टीम अवघ्या 50 रन्समध्ये गारद केला. आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 विकेट्स राखून पराभव केला. दरम्यान या सामन्यात मोहम्मद सिराजने त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर 7 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स घेतल्या. यावेळी जर त्याला अजून एक ओव्हर मिळाली असता त्याला विकेटही मिळाली असती. मात्र अशावेळी रोहितने ( Rohit Sharma ) त्याला ओव्हर दिली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान अशावेळी चाहत्यांच्या मनात प्रश्न येतोय की, रोहित शर्माने मोहम्मद सिराजला ( Mohammed Siraj ) ओव्हर का दिली नाही? यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला सिराजला ओव्हर न देण्याबाबात खुलासा केला आहे.


...तर मोडला असता बिन्नीचा रेकॉर्ड


मोहम्मद सिराजच्या ( Mohammed Siraj ) सहाव्या ओव्हरनंतर कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) थर्ड मॅनच्या दिशेने गेला. यावेळी त्याने चर्चा केली. सिराजला अजून एक ओव्हर टाकायची होती मात्र रोहितच्या त्या चर्चेनंतर सिराजला ( Mohammed Siraj ) ओव्हर देण्यात आली नाही. सिराजने जर सातवी विकेट घेतली असती असत्या तर त्याने स्टुअर्ट बिन्नीचा रेकॉर्ड मोडीत काढला असता.


काय म्हणाला रोहित शर्मा?


सामन्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला, "त्याने 7 ओव्हर्स टाकले होते. मला त्याला आणखी ओव्हर्स द्यायच्या होत्या. पण मला माझ्या ट्रेनर्सकडून मेसेज आला की त्याला आता थांबवलं पाहिजे. सिराज ( Mohammed Siraj ) स्वत: गोलंदाजीबद्दल उत्साही होता. पण कोणत्याही गोलंदाजाचा किंवा फलंदाजाचा स्वभाव असतो की, ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी त्याचा फायदा घेणं. पण इथेच माझी भूमिका महत्त्वाची असते. मला सर्व काही नियंत्रणात ठेवावं लागतं जेणेकरून कोणताही खेळाडूने स्वतःवर जास्त दबाव आणू नये आणि थकू नये."


रोहित ( Rohit Sharma ) पुढे म्हणाला की, "मला आठवतंय आम्ही त्रिवेंद्रममध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळत होतो तेव्हाही अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी त्याने चार विकेट घेतल्या आणि 8-9 ओव्हर्स टाकले होते. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारतासाठी तीन गोलंदाजांनी ओव्हर्स फेकल्या. सिराजला ( Mohammed Siraj ) इतर दोघांच्या तुलनेत थोडी अधिक गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. रविवारी सिराजचा दिवस होता. तो त्या दिवशीचा हिरो ठरला.