Stuart Broad On Yuvraj Singh: इंग्लंडच्या गोलंदाजीची मशिन गन म्हणून ओळख असलेला स्टार गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेनंतर आता ब्रॉड क्रिकेटला रामराम ठोकणार आहे. आजचा सामना त्यासाठी शेवटचा दिवस असेल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने निवृत्ती जाहीर केली. त्यावेळी ब्रॉड भावूक झाल्याचं दिसून आलं. त्यावेळी त्याने युवराज सिंह याच्या सहा सिक्सची देखील आठवण काढली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2007 मध्ये खेळवला गेला होता. या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध भारत सामना सुरू असताना युवराज सिंह याने एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स खेचले होते. त्यावेळी गोलंदाज होता, स्टुअर्ट ब्रॉड... याच स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीवेळी युवराज सिंहच्या सहा सिक्सच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.


Stuart Broad काय म्हणाला?


तो दिवस माझ्यासाठी खूप अवघड होता. त्यावेळी मी अंदाजे 21-22 वर्षाचा असेल. त्यानंतर मी त्यातून खूप काही शिकलो. माझा सगळी मानसिक स्थिती त्यावरच अवलंबून होती. मी बॉलिंग करण्याआधी काहीही करत नव्हतो. त्यामुळे माझा फोकस पूर्णपणे बॉलिंगवर नसायची, असं ब्रॉड म्हणतो. त्या अनुभवानंतर माझ्यातील वॉरियर जागा झाला. मला वाटतं माझ्यासोबत असं होऊ नये. त्या मॅचमुळं आम्ही फक्त वर्ल्ड कपमधून बाहेर पडलो नाही तर आज मी जे काही आहे, ते त्याच मॅचमुळे आहे, असं म्हणचत ब्रॉडने युवराजच्या सहा सिक्सच्या आठवणी जाग्या केल्या. मला आता मागे वळून पाहताना कोणतीही अपराधिक भावना नसेल, असंही ब्रॉड म्हणतो.


आणखी वाचा - Stuart Broad Retirement: स्टुअर्ड ब्रॉडचा क्रिकेटला अलविदा! 'या' दिवशी खेळणार अखेरचा सामना


दरम्यान, उद्या किंवा सोमवार हा माझा क्रिकेटमधील शेवटचा सामना असेल. माझ्यासाठी हा सुखद अनुभव होता. काल रात्री साडेआठ वाजता मी ठरवलं. निवृत्तीबाबत मी गेल्या आठवड्यापासून मी विचार करत होतो. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना माझ्यासाठी सर्वोत्तम होता. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना माझ्यासाठी नेहमीच शिखराचा राहिलाय. मला वाटतं की माझी शेवटची मॅच ही अॅशेसमध्ये असावी, असं स्टुअर्ड ब्रॉड म्हणाला आहे.