Ashes 2023 : ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड ( England vs Australia ) यांच्यामध्ये अॅशेज सिरीजमधील ( Ashes 2023 ) शेवटचा सामना खेळवला जातोय. या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने 2-1 ने आघाडी घेतली असून ही टेस्ट निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 283 रन्स केले. तर ऑस्ट्रेलियाचा डाव 295 रन्सवर आटोपला. दरम्यान यावेळी मार्नस लाबुशेनच्या विकेटवरून एक गंमतीशीर प्रकार घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडला 283 रन्सवर बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात मार्नस लबुशेन ( Marnus Labuschagne ) शांतपणे खेळता होता. यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने गोलंदाजी न करताच अशी जादू केली की, पुढच्याच चेंडूवर लाबुशेन विकेट देऊन बसला. दरम्यान विकेट गमावल्यानंतर नेमकं काय झालं, हे लाबुशेनला ( Marnus Labuschagne ) देखील कळलं नाही. 


ही घटना घडली ती, ऑस्ट्रेलियाच्या डावातील 43व्या ओव्हरमध्ये. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड गोलंदाजी करत होता. यावेळी ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेन ( Marnus Labuschagne ) काळजीपूर्वक खेळत होता. यावेळी ब्रॉड शॉर्ट मिड-विकेटवर उभा होता. इतक्यात ब्रॉडने स्टंपवर ठेवलेल्या बेल्सची जागा बदलली. हे पाहून लाबुशेनला काही कळलं नाही, त्यामुळे तो हसू लागला. 


पुढच्याच बॉलला लाबुशेनने गमावली विकेट


लाबुशेनच्या मनातंही आलं नसेल पण असं घडलं. कारण पुढच्याच बॉलला लाबुशेनची ( Marnus Labuschagne ) विकेट गेली. टाकलेला बॉल त्याच्या बॅटच्या कटवर आदळला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या जो रूटने त्याचा कॅच घेतला. हा कॅच पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. पण यावेळी लाबुशेन ब्रॉडच्या जाळ्यात फसल्याचं दिसून आलं. मुळात आऊट झाल्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडने उस्मान ख्वाजाकडे जाऊन त्याच्या पाठीवर थाप दिली. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. 


इंग्लंड क्रिकेटने शेअर केला व्हिडीओ


इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही या विकेटचा व्हिडिओ शेअर केला. चाहत्यांच्या म्हणण्याप्रमाणे, लाबुशेनच्या विकेटमागे स्टुअर्ट ब्रॉडची जादू होती. दरम्यान विकेट गेल्यानंतर लाबुशेनचा ( Marnus Labuschagne ) चेहरा पाहण्यासारखा होता. 



स्टिव्ह स्मिथच्या विकेटवरून वाद


ऑस्ट्रलिया फलंदाजी करत असताना 77.3 ओव्हरमध्ये स्टिव्ह स्मिथ ( Steve Smith ) पॅट कमिन्ससह दोन रन्स पूर्ण करण्यासाठी धावला. मात्र याचदरम्यान विकेटकीपर जॉनी बेअरस्टोच्या हातात बॉल आल्याने त्याने रन आऊट केलं. जॉनी बेअरस्टोने बॉलने स्टंप उडवल्यानंतर इंग्लंड टीमने रनआऊटसाठी अपील केलं. मैदानावरील अंपायर्सने सामन्याचे थर्ड अंपायर नितीन मेनन यांची मदत घेतली.  नितीन मेनन यांनी वेगवेगळ्या अँगलमधून रनआऊट तपासून पाहिला. शेवटी स्टीव्ह स्मिथला नाबाद करार देण्यात आला. हा प्रकार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंना मोठा धक्का बसला.