World athletics championship 2023 : हंगेरी येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपची सांगता झाली आहे. या स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. त्यासोबत काल नीरज चोप्राने (Neeraj Chopra) दमदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवून दिलंय. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जोर लावला. भारताच्या पारुल चौधरीने महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 11 वं स्थान पटकावलं. त्यात त्याने 9:15.31 च्या वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम केला. यासह पारुल राष्ट्रीय विक्रम साधत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरली आहे.


शेतकऱ्याची लेक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पारूल चौधरी ही गरीब घराण्यातील मुलगी. मेरठच्या एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. पारूल एकेकाळी तिच्या गावापासून ते स्टेडियमपर्यंत पायी जात होती. तिथे पुन्हा तीन तासाचा सराव... कठोर परिश्रम करून तिने राष्ट्रीय स्तरावर मोठा विक्रम रचला होता. घरच्यांनी साथ दिली अन् पारूलने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर हंगेरी येथे तिने राष्ट्रीय विक्रम मोडलाय. आता ती 2024 मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.


स्टीपलचेस या स्पर्धेमध्ये ब्रुनेईची खेळाडू  विन्फ्रेड मुटाइलने 8:54.29 या वेळेत मोठा विक्रम रचला आहे. या वेळेसह त्याने सुवर्णपदकाला गवासणी घातली. तर केनियाच्या बीट्रिस चेपकोचने हंगामातील सर्वोत्कृष्ट 8:58.98 स्कोर करत रौप्य पदक जिंकलं. तर भारताच्या पारूल चौधरीला 9:15.31 मिनिटांचा वेळ लागला. ती स्पर्धेत 11 व्या स्थानी राहिली. 100 मीटर अंतर बाकी असताना ती 13 व्या स्थानी होती. त्यानंतर अखेरच्या काही सेकंदात तिने बाजी मारली अन् 11 व्या स्थानी झेप घेतली. 


नीरज चोप्राने रचला इतिहास


दरम्यान, 400 मीटर रिले शर्यतीत मुहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल आणि राजेश रमेश यांच्या भारतीय संघाने 2:59.05 सेकंदात शर्यत पूर्ण केली. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने पुन्हा सुवर्ण कामगिरी केली. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने  88.17 मीटर भाला फेकला अन् सुवर्णपदक पटकावलं.