Leaders : अपघातात हात गमावला, पण तरीही आपल्या जिद्दीच्या जोरावर देशासाठी पहिलं Gold Medal जिंकून इतिहास रचला
ज्यांना वाटते की त्यांचे नशिब त्यांना साथ देत नाही. ही कहाणी त्या प्रत्येक तरुणासाठी आहे, ज्याने आपल्या नशीबासमोर गुडघे टेकले आहे.
बुधापेस्ट : ही कहाणी अशा एका नायकाची ज्याच्या नशिबाने त्याला हरवण्यासाठी संपूर्ण तयारी केली होती, पण तरीही त्याने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीच्या जोरावर आपल्या नशिबाला हरवून इतिहास घडवला. ही कहाणी आहे KAROLY TAKACS ची, त्याची ही कहाणी सर्वच लोकांसाठी प्रेरणा देणारी आहे, ज्यांना वाटते की त्यांचे नशिब त्यांना साथ देत नाही. ही कहाणी त्या प्रत्येक तरुणासाठी आहे, ज्याने आपल्या नशीबासमोर गुडघे टेकले आहे.
KAROLY TAKACS कोण आहे?
करौलीचा जन्म 21 जानेवारी 1910 हंग्री (hungry) या ठिकाणी झाला. त्यानंतर 5 जानेवारी 1976 रोजी वयाच्या 65व्या वर्षी त्याने शेवटचा श्वास घेतला. करौली हा एक खेळाडू होता आणि त्याने नेमबाजीमध्ये 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकले होते.
परंतु त्याला हे यश सहज मिळालं नाही, यामागिल त्याचा प्रवास हा खूप रंजक होता.
मनुष्यप्राणी हा आपल्या अपयशाचे श्रेय नेहमीच त्याच्या नशिबाला किंवा त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांच्या कमतरतेला देतो, तरीही असे बरेच लोक आहेत ज्यांनी त्यांच्या जीवनाची शर्यत जिंकली आणि त्यांना जे मिळवायचे होते त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक त्यांनी मिळवले आहे.
ही कथा आहे एका नेमबाजाची ज्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर नशिबाला हरवले
हंगेरियन सैन्यात 1938 साली KAROLY TAKACS (करौली) एक शूटर होता. तो त्या देशातील सर्वोत्तम नेमबाज होता
1940 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये करौली सुवर्णपदक जिंकेल, अशी त्याच्याकडून संपूर्ण देशाची अपेक्षा होती, पण त्यानंतर त्याचा एक अपघात झाला. या अपघातात करौलीच्या हातात बॉम्बचा स्फोट झाला, त्यामुळे त्याचा उजवा हात निकामी झाली. त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, आता ते शूटिंग करु शकणार नाही.
नशीबाकडून हरवण्याची तयारी
करौली त्याच्या ध्येयापासून फक्त 2 वर्ष दूर होता, त्याला स्वतःवर पूर्ण विश्वास होता की तो नक्कीच जिंकेल पण त्याच्या नशीबाला त्याला हरवायचे होते. पण तो नशीबासमोर झुकला नाही, त्या अपघाताच्या 1 महिन्यानंतरच त्याने दुसऱ्या हाताने शूटिंगचा सराव सुरू केला. त्याला जगातील सर्वोत्कृष्ट नेमबाज बनायचे होते आणि त्यासाठी आता त्याच्याकडे फक्त त्याचा डावा हात शिल्लक होता.
काही वेळातच डावा हात सर्वोत्तम बनवला
त्याने आपला डावा हात काही वेळातच सर्वोत्तम हात बनवला. त्या दिवसात हंगरीमध्ये शूटिंग स्पर्धा होती, देशातील सर्व शूटर्स तिथे आले होते, करौलीला तेथे पाहून बाकिचे खेळाडू त्याला हिंमत देत होते आणि त्याला धीर देऊ लागले. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यासोबत एक अपघात झाला होता आणि तरीही तो बाकीच्या नेमबाजांना प्रोत्साहन देण्यासाठी आला होता.
पण खरं तर तो तिथे त्यांच्याशी स्पर्धा करायला गेला होता, तोही त्याच्या डाव्या हाताने आणि शेवटी करौलीने ती स्पर्धा जिंकली.
2 वर्षात, त्याने आपला डावा हात इतका तंदुरुस्त केला की, तो येत्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकेल. पण 1940 मध्ये होणारे ऑलिम्पिक खेळ दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द झाले. पण करौली खूप निराश झाला पण त्याने हिंमत न हारता 1944 च्या ऑलिम्पिकसाठी स्वतःला तयार केले आणि 1944 चे ऑलिम्पिक देखील रद्द झाले. करौलीने तरीही हार मानली नाही आणि 1948 मध्ये आपल्या देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.
इतिहास घडवला
करौलीचे स्वप्न पूर्ण झाले पण तरीही तो थांबला नाही आणि त्याने 1952 मध्ये ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला आणि पुन्हा एकदा करौली टाकाक्सने सुवर्णपदक जिंकले. यासह, सलग दोनदा सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला.
लक्षात घ्या की, हरणाऱ्यांकडे त्यांच्या हरण्याची हजारो कारणं असतात, पण जिंकणाऱ्याकडे एकच कारण असते ते म्हणजे त्याचं लक्ष आणि त्याची जिद्द ज्यामुळे तो जिंकतो. एखादी गोष्ट करायची ठरवली, तर ती व्हायलाच हवी, मग जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला ते काम करण्यापासून कधीही रोखू शकत नाही.