IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु असून यातील चौथा सामना 26 डिसेंबर पासून मेलबर्नमध्ये सुरु आहे. सामान्याच्या दिवशी विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या मैदानातील वागणुकीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला. ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या १९ वर्षीय फलंदाजाला त्याने चालू सामन्यात जाणूनबुजून धक्का दिला. ज्यावरून मैदानात वाद झाला आणि यासाठी विराटवर आयसीसीने दंडात्मक कारवाई देखील केली. यावर आता माजी क्रिकेटर सुनील गावसकर आणि इरफान पठाणने देखील विराटला फटकारलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेलबर्न टेस्टचा पहिला दिवस हा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गाजवला. बॉक्सिंग टेस्टच्या पहिल्या दिवशी 86 ओव्हर्स झाल्या असून यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स गमावून 311 धावा केल्या. तर भारताकडून सर्वाधिक 3 विकेट्स स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने घेतल्या. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 19 वर्षीय सलामीवीर फलंदाज सॅम कोस्टांस याने जबरदस्त फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्याने 65 बॉलमध्ये 60 धावा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान 10 वी ओव्हर सुरु असताना विराट आणि सॅम कोस्टांसमध्ये मैदानात वाद झाला. 


नेमकं काय घडलं? 


मेलबर्न टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची 10 वी ओव्हर सुरु असताना विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम कोंस्टसला धक्का दिला. त्यानंतर दोघांमध्ये मैदानात वादही झाला. तेव्हाच ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आणि मैदानातील अंपायरनि मध्यस्ती केली आणि वाद मिटवला. ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.12 नुसार आंतरराष्ट्रीय खेळाडू, खेळाडूचा सहाय्यक कर्मचारी, अंपायर, मॅच रेफरी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी अयोग्य आणि जाणूनबुजून शारीरिक संपर्क करणे हा लेव्हल 2 चा गुन्हा आहे. विराट कोहलीने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टने केलेले निर्बंध मान्य केल्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही.आयसीसीने कारवाई केली असून यात विराट कोहलीवर मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला असून त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.


हेही वाचा : IND VS AUS : 'अरे गल्ली क्रिकेट खेळतोयस का?' Live मॅचमध्ये रोहित शर्मा युवा खेळाडूवर भडकला, Video व्हायरल



इरफान आणि गावसकरने विराटवर व्यक्त केली नाराजी : 


माजी क्रिकेटर आणि कॉमेंटेटर असलेल्या इरफान पठानने विराट कोहलीने मैदानात केलेल्या वादग्रस्त कृतीवर भाष्य केले. तो म्हणाला, "असं करायची काही गरज नव्हती. सामन्यादरम्यान खेळाडू एकमेकांकडे रागाने बघतात, त्यांच्याजवळ जाऊन घाबरवण्याचा प्रयत्न करतात पण कोणाला धक्का मारण्याची परवानगी आयसीसीचे नियम देत नाहीत. विराटने जे केलं ते खूप चुकीचं होतं. तुम्ही 19 वर्षांचा खेळाडू जी त्याचा पहिला सामना खेळतोय त्याच्या सोबत असं कसं करू शकता. एक विचार करा जर कोणत्या ऑस्ट्रेलियन खेळाडूने भारताच्या डेब्यू करणाऱ्या युवा खेळाडूसोबत असं केलं असतं तर...".  


यावर सुनील गावस्कर म्हणाले, "मला तर ही गोष्ट अजिबात समजली नाही की विराट कोहलीने असे काय विचार करून केले असावे. याप्रकारची गोष्ट करण्याची काही गरज नव्हती. स्लेजिंग करणं ठीक आहे पण कोणत्याही फलंदाजाला धक्का मारणं चांगलं नाही".