IND VS AUS 4th Test : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) सामन्याचा चौथा दिवस खूपच रोमांचक ठरला. गुरुवारी 26 डिसेंबर पासून बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील (Border Gavaskar Trophy) निर्णायक सामन्याला सुरुवात झाली. हा सामना WTC फायनलचं तिकीट मिळवण्याकरता दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. पहिल्या दिवशी मैदानावर ऑस्ट्रेलियाचाच बोलबाला राहिला. त्यांच्या पहिल्या चार फलंदाजांनी अर्धशतकीय खेळी केली आणि 6 विकेट्स दिवस अखेरीस 6 विकेट्स गमावून 311 धावा केल्या. टीम ऑस्ट्रेलियन फलंदाजांची विकेट घेण्यात भारतीय गोलंदाजांची काहीशी दमछाकच झालेली पाहायला मिळाली. दरम्यान फिल्डिंग करताना हलगर्जीपणा करत असल्याने रोहित शर्माने (Rohit Sharma) एका खेळाडूवर भडकला. त्याच बोलणं स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु असून आतापर्यंत सीरिजचे तीन सामने पार पडले असून सध्या सीरिज 1-1 अशा बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 19 वर्षीय सलामीवीर फलंदाज सॅम कोस्टांस याने जबरदस्त फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्याने 65 बॉलमध्ये 60 धावा करून सर्वांनाच धक्का दिला.
लाईव्ह सामन्या दरम्यान मैदानात ड्रामा पाहायला मिळाला. एकीकडे विराटने सामना सुरु असताना ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम कोस्टांस याला धक्का दिला. ज्यावरून मैदानात वाद झाला आणि आयसीसीने विराटवर दंडात्मक कारवाई सुद्धा केली. तर सामना सुरु असतानाच रोहित शर्माने युवा क्रिकेटर यशस्वी जयस्वालला देखील सुनावल्याचा व्हिडीओ सध्या समोर येत आहे. दोघांमधील बोलणं हे स्टंप माइक्रोफोनमध्ये रेकॉर्ड झालं.
हेही वाचा : विराट कोहलीला 'तो' धक्का महागात पडला, ICC कडून मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?
यशस्वी जयस्वाल हा सिल्ली पॉईंटवर फील्डिंग करत होता. यावेळी स्टीव्ह स्मिथने रवींद्र जडेजाने टाकलेय बॉलवर डिफेंसिव शॉट खेळला त्यावेळी जयस्वालने जागेवर उडी मारली. रोहितला हे पाहून राग आला आणि त्याने यशस्वी जयस्वालला 'अरे जैसू, गली क्रिकेट खेळतोयस का? खाली बस जोपर्यंत फलंदाज बॉल खेळत नाही तो पर्यंत उठायचं नाही'.
Stump Mic Gold ft. THE BEST, ImRo45!
The Indian skipper never fails to entertain when he’s near the mic! AUSvINDOnStar 4th Test, Day 1 LIVE NOW pic.twitter.com/1fnc6X054a
— Star Sports (StarSportsIndia) December 26, 2024
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप