IPL 2024 : `विराट कोहलीने 120 धावा केल्या तरी...`, सुनील गावस्कर यांनी RCB वर का काढला राग?
Sunil Gavaskar Blasts At RCB : लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी आरसीबीला चांगलंच धारेवर धरलं अन् जोरदार टीका केली आहे.
Sunil Gavaskar On RCB : बंगळुरुच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या बंगळुरू विरुद्ध केकेआर (RCB vs KKR) सामन्यात कोलकाताने एकहाती विजय मिळवला. विराट कोहलीने (Virat Kohli) शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यामध्ये 83 धावांची खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यर (50 धावा) आणि सुनील नरेन (47 धावा) यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने 19 चेंडू शिल्लक असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 186 धावा केल्या होत्या. त्यामुळे कोलकाताने बंगळुरूला पाणी पाजलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच आता सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
बंगळुरूकडून खेळताना विराट कोहली सलामीला आला होता आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला, पण दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या आणि कोणताही फलंदाज जास्त काळ टिकू शकला नाही. त्यामुळे अनेकांनी आरसीबीच्या फलंदाजीवर टीका केलीये. तर गोलंदाजीला तर घरघर लागल्याची टीका होताना दिसत आहे. अशातच स्टार स्पोर्ट्सवर बोलताना लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी आरसीबीला चांगलंच धारेवर धरलं अन् जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले सुनील गावस्कर?
तुम्हीच सांगा.. कोहली एकटा खेळून खेळून किती खेळेल? त्याला कुणीतरी पाठिंबा द्यायला कुणीतरी हवं ना..., आज त्याला कुणी पाठिंबा दिला असता तर त्याने नक्कीच 83 ऐवजी 120 धावा केल्या असत्या. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, हा कोणा एकट्याचा खेळ नाही, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. घरच्या मैदानावर खेळताना सामना गमावणारी आरसीबी ही यंदाच्या पर्वातील पहिलीच टीम ठरली. त्यामुळे आता आरसीबी आयपीएल जिंकणार तरी कशी? यावरून आरसीबीचे फॅन्स चिंतेत दिसत आहेत.
कसंय पॉईंट्स टेबलचं गणित?
सलग दुसरा विजय मिळवत केकेआर संघाचे 4 गुण झाले आहेत. त्यासोबतच नेट रनरेटमध्येही चांगली सुधारणा झाली. पॉईंट टेबलमध्ये सीएसके एक नंबरला गेला आहे पण केकेआर आणि राजस्थान यांचेही 4 गुण झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3 सामन्यांत 1 विजयानंतर 2 पॉईंट्स पटकावलेत. आरसीबीचं नेट रनरेट -0.711 असून ते सहाव्या स्थानावर आहे. दिल्ली आणि मुंबईच्या टीमला यंदाच्या सिझनमध्ये एकंही विजय मिळवता न आल्याने या दोन्ही टीम्स तळाला आहे.