T20 World Cup 2022 मध्ये भारताने पाकिस्तानवर शेवटच्या बॉलवर विजय मिळवला. यावेळी इरफान पठाण, सुनील गावस्कर आणि कृष्णमाचारी श्रीकांत यांसारखे अनेक दिग्गज खेळाडू देखील आनंद व्यक्त करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही. सुनील गावस्कर मैदानावरच उड्या मारुन (pic.twitter.com/5RkFtEJ1nx

— Johns. (@CricCrazyJohns) October 23, 2022

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने 53 बॉलमध्ये नाबाद 82 धावांची शानदार खेळी करत भारतासाठी विजय खेचून आणला. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यामुळे गावस्करच्या उत्स्फूर्त सेलिब्रेशनचं कौतुक होत असून व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.


गावस्कर आणि श्रीकांत समालोचन म्हणून तेथे उपस्थित आहेत. इरफान पठान देखील त्यांच्या सोबत दिसत आहे. खचाखच भरलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारताच्या विजयानंतर गावस्कर आनंदात उड्या मारत होते.