Sunil Gavaskar : ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्डकपला (T20 World Cup 2022) सुरुवात झाली आहे. भारतीय संघ (Team India) यंदाही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) कडे भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आहे. टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. यातच भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाबाबत भाकीत केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी रोहित शर्माला एक भन्नाट उपाय सुचवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत पुन्हा एकदा टी-20 विश्वविजेता (T20 Champions) बनू शकतो, असंही सुनील गावस्कर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पंत आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) दोघं एकसोबत संघात कसे असू शकतात, यावर सुनिल गावस्कर यांनी रोहितला मार्ग दाखवला आहे.


काय म्हणाले Sunil Gavaskar -


जर रोहितने सहा गोलंदाजांसह जाण्याचा निर्णय घेतला आणि हार्दिक पांड्या सहावा गोलंदाज असेल तर ऋषभ पंतला संघात स्थान मिळणार नाही. पण जर त्यांनी हार्दिक पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला, तर ऋषभ पंतला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळेल आणि कार्तिकला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळेल, त्यानंतर चार गोलंदाज येतील, असं सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणाले आहेत.


वर्ल्ड कपमधील The Pallu Scoop शॉटची एकच चर्चा, पठ्ठ्याला पाहून पुन्हा दिलशान आठवला!


दरम्यान, रिषभ पंतसारख्या (Rishabh Pant) चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या डावखुऱ्या फलंदाजाचा संघात समावेश करायला रोहितला नक्कीच आवडेल. कधी कधी तुम्ही स्वतःला विचाराल का?, ऋषभ पंतला किती ओव्हर्स खेळायला मिळतील?, असा सवाल देखील सुनिल गावस्कर यांनी विचारला आहे. भारतीय संघ T-20 विश्वचषक जिंकू शकतो. मला खात्री आहे की प्रत्येक संघाला नशिबाची गरज असते, असंही सुनिल गावस्कर म्हणाले होते.