ICC Mens T20 World Cup 2022 ला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. सध्या ग्रुप स्टेजचे सामने खेळले जात आहेत. वर्ल्ड कपचा 10 वा सामना नामिबिया (Namibia) आणि युएईमध्ये (United Arab Emirates) खेळला जातोय. या सामन्यात (uae vs namibia today match) युएईने धमाकेदार फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 148 धावा कुटल्या. 149 धावांचा पाठलाग करताना नामिबियाचा संघ 141 धावांवर गारद झाला.
uae vs namibia यांच्यातील सामन्यात एक असा क्रिकेटिंग शॉट पहायला मिळाला, ज्यामुळे तुम्हालाही श्रीलंकेचा स्टार फलंदाज तिलकरत्ने दिलशानची (Tillakaratne Dilshan) आठवण आल्याशिवाय राहणार नाही. The Pallu Scoop नावाने प्रसिद्ध असलेला हा शॉट अनेक खेळाडू खेळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेकांना तो जमत नाही. अशातच आता युएईचा खेळाडू बासिल हमीदने पल्लू शॉट खेळून अनेकांनी जुनी आठवण करून दिली.
युएई आणि नामिबिया (uae vs namibia) यांच्यात सामना सुरू होता. युएई फलंदाजी करत असताना अखेरच्या षटकात आक्रमक फलंदाजी केली. स्मितने टाकलेल्या 5 व्या बॉलवर बासिल हमीदने चौकार खेचला. त्यामुळे युएईकडून अखेरच्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा निघल्या.
आणखी वाचा - T20 World Cup आधीच सुर्याला आला कंटाळा, Stump Mic मध्ये सगळं रेकॉर्ड झालं, म्हणाला..
बेसिल हमीदने (Basil Hameed) मागच्या वेळी रिव्हर्स-लॅपचा प्रयत्न केला होता मात्र, बॅट आणि बॉल कनेक्ट झाला नाही. मात्र, त्याच्या पुढच्या चेंडूवर बासिल हमीदने The Pallu Scoop शॉट खेळला. त्यावेळी मात्र, त्याला यश आलं.
दरम्यान, युएईने अखेरच्या षटकात सामना पलटवला. सामन्या जिंकण्यासाठी अखेरच्या षटकाच नामिबियाला 14 धावांची गरज होती. नामिबियाला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे आजचा सामना नामिबियासाठी करो किंवा मरोचा सामना होता. मात्र, आता नामिबियाचा संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे.