`हार्दिक फिट झाला तरी...`, पांड्याला `या` खेळाडूमुळे मिळणार तीळ तांदूळ, सुनिल गावस्कर म्हणतात...
Sunil Gavaskar On Shivam Dube : शिवमने अधिकाधिक गोलंदाजी करण्याची गरज आहे. त्याने उत्तम गोलंदाजी केल्यास तो संघासाठी मौल्यवान खेळाडू ठरू शकतो. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे शिवमवरील जबाबदारी वाढू शकते.
T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दुखापतग्रस्त होत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता रोहित शर्माने (Rohit Sharma) हार्दिकला एक पर्याय शोधून काढलाय. त्याचं नाव शिवम दुबे... अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत शिवमने मॅच विनिंग खेळी केली आहे. त्याने पहिल्या सामन्यात नाबाद 60 आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 63 धावांची खेळी केली. गोलंदाजीतही चमदार कामगिरी करत त्याने विकेट्स देखील काढल्या. त्यावर आता सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाले Sunil Gavaskar ?
टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) आता जवळ येतोय. हार्दिक पांड्या जर अनफिट असेल तर काय? असा सवाल विचारला जातोय. त्याच्या आक्रमक खेळीमुळे त्याने आता निश्चित केलंय की हार्दिक पांड्या फिट असला तरी तो आता टी-ट्वेंटी टीमच्या स्कॉडमध्ये जागा मिळवू शकतो. जर तुम्ही अशी कामगिरी करत असाल तर तुम्हाला संघाबाहेर ठेवणं चुकीचं ठरेल. जर सिलेक्टर्सने त्याच्या नावाचा विचार केला नाही तर टीम इंडियासाठी हा निर्णय असेल, असं मत सुनिल गावस्कर यांनी व्यक्त केलंय.
मला वाटतं की, शिवम दुबे त्याच्या खेळाला अधिक सहजरित्या घेतो. त्याला त्याचा खेळ चांगलाच माहितीये, तो फलंदाजी करताना कोणाचीही नकल करत नाही. तो त्याची फ्री स्टाईल बॅटिंग करतो, असं सुनिल गावस्कर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिवमने अधिकाधिक गोलंदाजी करण्याची गरज आहे. त्याने उत्तम गोलंदाजी केल्यास तो संघासाठी मौल्यवान खेळाडू ठरू शकतो. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे शिवमवरील जबाबदारी वाढू शकते, असं बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितलं होतं. त्यामुळे शिवम दुबेला अफगाणिस्तानविरुद्ध संधी देण्यात आली होती. शिवमने देखील विश्वासाला सकारात्मक प्रतिसाद देत रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला आहे. त्यामुळे आता हार्दिक पांड्याला तीळ तांदूळ देऊन शिवम दुबेला टी-ट्वेंटी स्कॉडमध्ये संधी मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.