Sunil Gavaskar: इंग्लिश कॉमेंटेटर्सकडून भारतीयांची टिंगल, लिटल मास्टरांनी घेतली गोऱ्या साहेबांची शाळा; म्हणाले..
Sunil Gavaskar On Ashes 2023: भारतीय चाहते त्यांच्या घरच्या संघालाच सपोर्ट करताना दिसतात, असं इंग्लिश समालोचकांनी म्हटलं होतं. त्यावर आता बर्थडे बॉल (Sunil Gavaskar Birthday) सुनील गावस्कर यांनी सडकून टीका केली आहे. ब्लॉगमध्ये त्यांनी गोऱ्या साहेबांची शाळा घेतली आहे.
Sunil Gavaskar Slams English Commentators: सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना जिंकून इंग्लंडने कांगारूंना (ENG vs AUS) धुळ चारली. मात्र, अद्याप इंग्लंड मालिकेत 2-1 ने मागे आहे. अशातच सामना जिंकल्यावर समालोचकांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भारतीय चाहते त्यांच्या घरच्या संघालाच सपोर्ट करताना दिसतात, असं इंग्लिश समालोचकांनी म्हटलं होतं. त्यावर आता बर्थडे बॉल (Sunil Gavaskar Birthday) सुनील गावस्कर यांनी सडकून टीका केली आहे. मिड डेला लिहिलेल्या ब्लॉगमध्ये त्यांनी गोऱ्या साहेबांची शाळा घेतली आहे.
काय म्हणाले सुनील गावस्कर?
मैदानातील चाहते त्यांच्याच टीमला पाठिंबा देतील आणि विरोधकांना प्रोत्साहन देणार नाहीत हे स्वाभाविक आहे. पण हे फक्त भारतातच घडतं असं म्हणणं योग्य नाही, असं म्हणत गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी इंग्लिश समालोचकांची शाळा घेतली. ही काही भारतीय घटना नाही परंतु प्रत्येक देशात असं घडतं जिथं चाहते गप्प बसतात जेव्हा विरोधी संघाचे खेळाडू चौकार मारतात किंवा आपल्या देशाचे फलंदाज बाद होतात, असंही गावस्कर म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी परदेशी माध्यमांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. टीमचं मोठं अपयश लपवण्यासाठी एखादी छोटीशी घटना घडवून आणली जाते, असं म्हणत गावस्करांनी सडकून टीका देखील केली आहे.
सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत (Ashes 2023) तुमचे लोक कोणालाच सपोर्ट करत नाही. उलट ते येऊन नुसतं शांत बसतात, यापेक्षा अधिक स्पष्ट चित्र कुठंही दिसत नाही, असं म्हणत त्यांनी सणसणीत टोला लगावला आहे. त्यावेळी त्यांनी बेन स्टोक्स कौतूक केलंय. सामन्याच्या अधिक महत्त्वाच्या घटनांमुळे लहान गोष्टी लगेच झाकल्या जातात याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं मत गावस्कर यांनी मांडलं आहे.
एखादा परदेशी समालोचक भारतात आल्यावर सांगतो की, भारतीय फलंदाज बाद होतो किंवा भारतीय गोलंदाज चौकार मारतो तेव्हा मैदानावर लगेच शांतता पसरते. पण तुमच्याकडे नेहमीच शांत प्रेक्षक असतात, त्यामुळे प्रत्येक देश तेथील माणसे ही वेगळी असतात, असं म्हणत गावस्कर यांनी समजवण्याचा देखील प्रयत्न केला आहे.