Sunil Narine First Cricketer Red Card : अनेकदा फुटबॉलचा सामना असेल किंवा हॉकीचा सामना, प्लेयर्सने चुकीचं कृत्य केलं किंवा नियमांचं उल्लंघन करून गैरवर्तवणूक केली तर त्याला रेड कार्ड (Red Card) देण्याची प्रथा आहे. फुटबॉलच्या प्रत्येक सामन्यात यलो कार्ड किंवा रेड कार्ड मिळाल्याचं आपण पाहतो. मात्र, क्रिकेटमध्ये रेड कार्डमध्ये (Red Card In Cricket) दिल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? होय, क्रिकेटमध्ये रेड कार्ड... नुकत्याच खेळल्या जात असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये रेड कार्ड दाखवला गेला आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. याचा व्हिडीओ (Viral Video) देखील आता समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजचा स्टार प्लेयर सुनील नरेन हा रेड कार्ड मिळालेला पहिला खेळाडू ठरला आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर आता क्रिकेटमध्ये देखील रेड कार्डची दखल घेतली जाणार आहे. कॅप्टनच्या चुकीवरून नरेनला रेड कार्ड देण्यात आलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर क्रिकेटमध्ये रेड कार्ड असावं की नसावं? असा सवाल विचारला जात आहे. नेमकं कोणत्या कारणावरून नरेनला रेड कार्ड देण्यात आलं? हे पाहूया...


झालं असं की,  रविवारी म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रिओट्स आणि त्रिनबागो नाईट रायडर्स (SKNP vs TKR) यांच्या सामना सुरू होता. किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील त्रिनबागो नाइट रायडर्स (TKR) चा संघ खेळत होता. फिल्डिंग करणाऱ्या संघाने वेळेत 18 ओव्हर टाकल्या तर थर्टी यार्डच्या आतमध्ये एका फिल्डरला आणावं लागेल. मात्र, पोलर्डच्या टीमला तिसरा ओव्हर-रेट पेनल्टी मिळाला. त्यानंतर अंपायरने रेड कार्ड देण्याचा निर्णय घेतला.


पाहा Video



दरम्यान, 19 व्या ओव्हरनंतर अंपायरने टीमला रेड कार्ड दाखवलं. रायडर्सचा कर्णधार पोलार्डने अखेरच्या षटकात फिरकीपटू सुनील नरेनला (Sunil Narine) मैदानाबाहेर पाठवलं. अशाप्रकारे क्रिकेटमध्ये रेड कॉर्ड मिळवणारा नरेन पहिला खेळाडू ठरला. पॅट्रियट्सने मर्यादित 20 ओव्हरमध्ये 178 धावा केल्या. त्यानंतर ट्रिनबॅगोने 179 धावांचं लक्ष्य सहा विकेट्स राखून पूर्ण केलं.