RR vs SRH: जीतके हारनेवालो को `राजस्थान` केहते है; No Ball ने केला रजवाड्यांचा गेम!
RR vs SRH, IPL 2023: एका नो बॉलने (No Ball) राजस्थानचा घात केला. आता सर्वांच्या हृद्याचे ठोके वाढले. आता पुन्हा समद (Abdul Samad) स्टाईकवर होता. आता हैदराबादला (Sunrisers Hyderabad) जिंकण्यासाठी 4 धावांची गरज होती. समदने संदीप शर्माला (Sandeep Sharma) सिक्स खेचला आणि राजस्थानला (Rajasthan Royals) पराभवाचं पाणी पाजलं.
Sandeep Sharma Hit Six Abdul Samad: एक बॉलवर 5 रन्सची गरज होती. स्टाईकवर होता अब्दुल समद (Abdul Samad). संदीप शर्माने (Sandeep Sharma) यॉर्कर केला अन् समदने लॉन ऑफच्या दिशेने बॉल उचलला. शतक हुकलेल्या बटलरने (jos Buttler) कॅच पकडला अन् मैदानात एकच कल्ला सुरू झाला. राजस्थानचे नगाडे वाजले पण अंपायरने एक कौल दिला आणि मैदानात भयंकर शांतता पसरली. तो कौल होता, नो बॉलचा. इथंच झाला रजवाड्यांचा गेम. एका नो बॉलने (No Ball) राजस्थानचा घात केला. आता सर्वांच्या हृद्याचे ठोके वाढले. आता पुन्हा समद स्टाईकवर होता. आता हैदराबादला (Sunrisers Hyderabad) जिंकण्यासाठी 4 धावांची गरज होती. समदने सिक्स खेचला आणि राजस्थानला (Rajasthan Royals) पराभवाचं पाणी पाजलं.
नेमकं काय झालं?
अखेरच्या ओव्हरमध्ये हैदराबादला विजयासाठी 6 बॉलमध्ये 17 धावांची गरज होती. हैदराबादकडून एम यानसन आणि अब्दुल समद हे दोघं मैदानात खेळत होते. तर संदीप शर्माकडे शेवटची आणि निर्णायक ओव्हर टाकण्याची जबाबदारी दिली. अखेरच्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर अब्दुल समद याने गगनचुंबी सिक्स मारला आणि जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानात एकच शांतता पसरली. आता हैदराबादला विजयासाठी 4 बॉलमध्ये 9 धावांची गरज होती. त्यानंतरच्या दोन बॉलवर 3 धावा पळून पूर्ण केल्या.
आणखी वाचा - Babar Azam: ना विराट ना रिझवान, बाबर आझम म्हणतो, मला 'हा' क्रिकेटर आवडतो!
सामना अधिकच रोमांचक होत होता. हैदराबादला विजयासाठी 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज होती. त्यावेळी मार्को यानसन स्टाईकवर होता. त्याने 1 धाव पूर्ण केली आणि अखेरचा चेंडू समदला दिला. आता 1 बॉलवर हैदराबादला विजयासाठी 5 धावांची गरज होती. संदीप शर्मा प्रेशरमध्ये आला. तर दुसरीकडे समद संयम राखून होता. समदने लॉग ऑफच्या दिशेने बॉल मारला अन् बॉन्ड्री लाईनवर उभा असलेल्या बटलरने कॅच झेलला. मैदानात एकच कल्ला सुरू झाला. राजस्थान जिंकल्याची टिकर देखील झळकलं. मात्र, अंपायरने एक हात आडवा केला आणि हैदराबादच्या जिवात जीव आला.
पाहा Video
अंपायरने नो बॉल दिल्याने राजस्थानचे खेळाडू कावरेबावरे झाले. नेमकं काय झालं काहींना सुचलंच नाही. कॅप्टन संजूने पुन्हा बॉल खेळवण्याची तयारी केली. संदीप शर्माच्या हातात पुन्हा बॉल आता, आता नेमके किती रन पाहिजे? अशी चर्चा सुरू झाली. प्रथम 1 बॉलवर 1 रन हवाय, असं दिसू लागलं. मात्र, बटलरने अंपायरशी चर्चा केली आणि 1 बॉलवर 4 धावांची गरज असं सांगण्यात आलं. अखेरच्या बॉलवर समदने लाँग ऑनच्या दिशेने बॉल उचलला आणि राजस्थानच्या तोंडाशी आलेला विजय हिसकावून नेला.