SRH vs MI IPL 2024 : सनरायझर्स हैदराबाद आयपीएलच्या इतिहास रेकॉर्ड रचला आहे. हैदराबादने आयपीएल इतिहासातील (Highest team score in IPL history) सर्वात मोठा स्कोर उभा केला. सनरायझर्सने 20 ओव्हरमध्ये 277 धावा केल्या. त्यामुळे आता मुंबईला विजयासाठी 278 धावा कराव्या लागणार आहे. त्याआधी 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध 263 धावा करत रेकॉर्ड केला होता. आता हाच रेकॉर्ड हैदराबादने मोडून काढला आहे. मागील आयपीएल हंगामात लखनऊने पंजाब किंग्जविरुद्ध 257 धावा केल्या होत्या. आता हैदराबादने सर्वांना मागे टाकून नवा विक्रम प्रस्थापित केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादकडून सलामीवीर ट्रेविस हेडने 24 बॉलमध्ये 62 धावा, अभिषेक शर्माने 23 बॉलमध्ये 62 तर हेनरिक क्लासेनने 34 बॉलमध्ये 80 धावा केल्या. तर मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. 17 वर्षांच्या क्वेना मफाकाला सर्वाधिक 66 धावा ठोकल्या. तर कॅप्टन हार्दिक पांड्याने देखील 4 ओव्हरमध्ये 46 धावा दिल्या. तर बुमराह सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज ठरला त्याला 4 ओव्हरमध्ये 36 धावा चोपल्या.


अभिषेक शर्माने प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. अभिषेक शर्माने अवघ्या 16 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं. अभिषेक शर्माने ट्रेविस हेड याच्यासोबत 68 धावांची भागिदारी केली. तर मार्करमसोबत 48 धावा जोडल्या. अखेरीस हेनरिक क्लासेनने मुंबईच्या गोलंदाजांना सुट्टी दिली नाही. क्लासेनने 34 बॉलमध्ये 80 धावा करत हैदराबादला नव्या उंचीवर पोहोचवलं.



सनरायझर्स हैदराबाद संघ - ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.


मुंबई इंडियन्स संघ - इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.