मुंबई : मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिलेला सुरेश रैना सध्या कॉमेंट्री करत आहे. आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा असूनही कोणत्याही टीमने संधी न दिल्याने कॉमेंट्री करण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. कॉमेंट्रीसाठी आलेल्या सुरेश रैनानं प्रिती झिंटावर कमेंट केली. ज्यामुळे एक प्लेअर नाराज झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2022 चे सामने चुरशीचे होत आहेत. अटीतटीच्या लढतीमध्ये कोण ट्रॉफी जिंकणार याची उत्सुकता वाढत आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये यंदा 10 संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी एकमेकांशी विरोधात खेळत आहेत. 


आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कॉमेंट्री करणारा स्टार फलंदाज सुरेश रैना प्रसिद्धीच्या झोतात आला. रैनाने लाईव्ह शोमध्ये प्रिती झिंटावर बोलताना एक अशी काही कमेंट केली ज्यामुळे तो चर्चेत आला.


सरेश रैनानं केलेली ही कमेंट इरफान पठानला अजिबात आवडली नाही. पंजाब विरुद्ध कोलकाता सामन्यात हा प्रकार घडला. सामन्याबाबत सगळेजण एकमेकांशी बोलत असताना हे घडलं. सुरेश रैना जे बोलला त्यावर इरफान पठाण संतापला आणि त्याने शो सोडण्याची धमकी दिली. 



इरफान पठाण लाईव्ह शोमधून जाऊ नयेत म्हणून रैनाला त्याला मनवण्याची वेळ आली. रैना इरफानची नाराजी दूर करण्यात यशस्वी झाला आणि दोघंही हसू लागले. खरं तर इरफान रैनावर नाराज नव्हता. त्याने रैनाला एप्रिल फूल करण्याचा प्लॅन केला होता. त्याचा एक भागा हा होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


सुरेश रैनानं चेन्नईकडून तुफान फलंदाजी केली. त्याने चेन्नईला काही सामने जिंकून दिले. जवळपास 10 ते 12 वर्ष चेन्नईसोबत राहिल्यानंतर चेन्नईनं त्याला रिटेन केलं नाही. ऑक्शनमध्येही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे रैना अनसोल्ड राहिला. रैनावर कमेंट्री करण्याची जबाबदारी देण्यात आली.