मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय संघाबाहेर असलेला सुरेश रैना परत एकदा चर्चेत आला आहे. पण चर्चेत येण्यामागचे कारण गंभीर आहे. काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर सुरेश रैनाचा मृत्यू झाल्याच्या अफवेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यासंपूर्ण प्रकरणावर पुढे येत सुरेश रैनाने ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून सुरेश रैनाचं मृत्यू झाल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला वैतागलेल्या रैनाने आपल्या भावना ट्विट द्वारे मांडल्या आहेत. 


रैनाने आपल्या ट्विट मध्ये म्हटलं की, माझा मृत्यू झाल्याची खोटी बातमी पेरली जात आहे. या अशा सर्व प्रकारामुळे मला, कुटुंबाला आणि माझ्या मित्रांना नाहक त्रास होत आहे. मला काहीही झालेले नाही. मी सुखरुप आहे. ज्यांनी माझ्या मृत्यूची खोटी बातमी दाखवली आहे, त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचं, रैनाने स्पष्ट केलं आहे. 


सध्या परिस्थितीत संघात स्थान न मिळवू शकलेला रैना उत्तर प्रदेशकडून खेळत आहे. गतवर्षी रैना उत्तर प्रदेशकडून झारखंडविरुद्ध डिसेंबरमध्ये अखेरचा सामना  खेळला होता. तसेच रैना अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना मागच्यावर्षी जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळला होता.