मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) चषकावर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील नवख्या गुजरात टायटन्स संघाने नाव कोरलं. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात मुंबईने पाच, तर चेन्नई चारवेळा चषकावर नाव कोरलं आहे. मात्र 15 व्या आयपीएल स्पर्धेत दोन्ही संघांची कामगिरी सुमार राहिली. गुणतालिकेत चेन्नई आणि मुंबई संघ तळाशी राहिले. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी 14 पैकी 10 सामने गमावले. त्यामुळे मुंबई दहाव्या, तर चेन्नईला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. आयपीएलच्या 15 व्या हंगामात मिस्टर आयपीएल नावाने प्रसिद्ध असलेला सुरेश रैना खेळताना दिसला नाही. चेन्नई संघाला सुरेश रैनाची उणीव भासली. रैनाने चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. रैना त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. आता रैनाचा गदा घेऊन वर्कआउट करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनाने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो गदा घेऊन व्यायाम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, गदा बजरंगबली गदेसारखी दिसते. दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,  आताही धोनी तुम्हाला संघात घेणार नाही.







सुरेश रैनाला चेन्नई सुपर किंग्जने संघात स्थान दिलं नाही. यानंतर 2 कोटींची मूळ किंमत असलेल्या सुरेश रैनाला कोणीही खरेदीदार मिळाला नाही.  या हंगामात रैना हा खेळाडू म्हणून दिसला नाही, पण रैनाने समालोचनातून आपली छाप सोडली. 


चेन्नईकडून खेळताना सुरेश रैनाने सर्वाधिक धावा केल्या आहेत. रैनाने आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या 205 सामन्यांमध्ये 32.32 च्या सरासरीने 5528 धावा केल्या आहेत. त्यांच्या पुढे विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर आहेत.