Suryakumar Yadav : भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने त्याच्या खेळीने सर्वांनाच भूरळ पाडली आहे. क्रिकेटविश्व त्याचं कौतुक करत असताना बीसीसीआयनेही त्याच्याकडे संघाचं उपकर्णधारपद सोपवलं आहे. सूर्यकुमारचा फॉर्म पाहता श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेमध्ये तो निवडला जाणार हे सर्वांना माहित होतं. मात्र त्याला उपकर्णधारपद दिलं जाईल हे कोणालाच वाटलं नव्हतं. खुद्द सूर्यकुमारलाही याबद्दल काही कल्पना नव्हती. यासंदर्भात सूर्याने त्याला कसं समजलं याबाबत माहिती दिली आहे. (Suryakumar Yadav got emotional as soon as he got to know that he has become the vice captain latest marathi sport news)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला माझ्या वडिलांनी याबद्दल सांगितलं, ते सोशल मीडियावर सक्रीय असतात त्यांनीच मला यादी पाठवली आणि एक मेसेजही दिला. कोणतंही दडपण घेऊ नको, तुझ्या बॅटींगवर लक्ष दे. मी काहीवेळ डोळे बंद केले आणि मलाच प्रश्न विचारला हे काही स्पप्न तर नाही नाही? पण खरच खूप छान वाटल्याचं सूर्या म्हणाला. 


मला स्वत: ला मी उपकर्णधार होईल अशी अपेक्षा नव्हती. यावर मी इतंकच म्हणेल की मी यावर्षी केलेल्या प्रदर्शनाचं हे बक्षीस असून मी   ही जबाबदारी पार पडण्यास खूप उत्सुक असल्याचं सूर्याने सांगितलं. 


दरम्यान, सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्येही सूर्याची बॅट तळपताना दिसत आहे. सौराष्टविरूद्धच्या सामन्यात त्याने 95 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये सूर्याने 14 चौकार आणि 1 षटकार मारला. पहिल्या सामन्यातही सूर्या 90 धावांवर बाद झाला होता त्यामुळे आज पुन्हा एकदा सूर्या शतकापासून वंचित राहिला.


टी-20 सिरीजसाठी टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वाशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार