मुंबई : आयपीएल -13 मध्ये 28 ऑक्टोबरला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान सूर्यकुमार आणि विराट कोहली समोरासमोर आले होते. यावर सूर्यकुमार यादवने खुलासा केला आहे. सामन्यादरम्यान, बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली सुर्यकुमारला भडकवण्याचा प्रयत्न करत होता. पण सूर्यकुमारने संयम राखला आणि कोहलीकडे दुर्लक्ष केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सामना जिंकताच सूर्यकुमारने कोहलीकडे पाहिले आणि विचारले, "सर्व काही ठीक आहे काय?" सूर्यकुमारच्या चाहत्यांना हे खूपच आवडले, त्याचे कारण म्हणजे त्यांनी नकारात्मक टीकेला सकारात्मक मार्गाने प्रतिसाद दिला. सामन्यात सूर्य कुमारने 79 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.


सूर्यकुमार यादव म्हणाला की, 'मी प्रत्येक सामन्यात विराटला ऊर्जेसोबत खेळताना पाहिले आहे. मुंबई विरुद्ध त्या सामन्यातच तो तसा होता असे नाही. जेव्हा तो भारताकडून खेळतो, फ्रँचायझी क्रिकेट खेळतो किंवा कोणत्याही संघाविरूद खेळतो तेव्हा तो तितकाच आक्रमक आणि उत्साही असतो'.


'बंगळुरूसाठी हा महत्वाचा सामना होता. सामन्यानंतर तो पुन्हा सामान्य झाला होता. त्यांनी मला म्हटलं की, तू चांगला खेळलास. पण त्यावेळी ही घटना इतकी चर्चेत येईल असं वाटलं नव्हतं.'