मुंबई : भारताचा पूर्व क्रिकेट खेळाडू वीवीएस लक्ष्मण (Vvs laxman) यांचे असे मत आहे की, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि  ईशान किशन (Ishan Kishan) हे दोघे ही या वर्षा अखेरीस होणाऱ्या टी -२० वर्ल्ड कप मॅच खेळण्यासाठी इंडियन टीममध्ये  स्थान मिळविण्यास पात्र आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 वर्षीय ईशान (Ishan Kishan) आणि 30 वर्षीय सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. इशानने इंग्लंडविरुद्ध 32 चेंडूत 56 धावा केल्या, तर सूर्यकुमारने चौथ्या आणि पाचव्या टी -20 सामन्यात अनुक्रमे 31 चेंडूंत 57 आणि 17 चेंडूत 32 धावा केल्या आहेत.


स्टार स्पोर्ट्स प्रोग्राम 'क्रिकेट कनेक्टिव्ह' मध्ये लक्ष्मणला (Vvs laxman) प्रश्न विचारल्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया दिली की, "हा एक अतिशय कठीण प्रश्न आहे, कारण आपण पाहिले आहे की, या मालिकेत बर्‍याच तरुणांनी संधीचा पुरेपूर फायदा घेतला आहे आणि आपली कामगीरी बजावली आहे."


तो पुढे म्हणाला, "ईशान (Ishan Kishan) आणि सूर्यकुमारने (Suryakumar Yadav)पहिल्या डावात ज्या प्रकारे कामगीरी केली आहे, त्यामुळे ते दोघे ही  माझ्या टीममध्ये टी -२० वर्ल्ड कपसाठीचे खरे दावेदार आहेत."


भारताचे माजी बॅटिंग कोच संजय बांगर (Sanjay Bangar) म्हणाले की, "टी -20  वर्ल्ड कपसाठी बराच वेळ आहे आणि बरेच खेळाडू आयपीएलमध्ये ही चांगली कामगिरी करून संघात स्थान मिळवू शकतात. आताची सर्व खेळाडूंची परिस्थिती पहाता कोणालाही टी -२० वर्ल्ड मध्ये आपली जागा निर्माण करण्याच्या शर्यतीतून बाहेर काढू शकत नाही. "


संजय बांगर (Sanjay Bangar) यांना भुवनेश्वर (Bhuvneshwar kumar) कुमार बद्दल प्रश्न केला आसता, " भुवनेश्वर कुमार अगदी फिट आहे आणि तो आता चांगल्या फॅार्ममध्ये आहे." असे वक्तव्य केले.