India vs South Africa 2nd T20 : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात (IND vs SA) खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने 180 धावा उभ्या केल्या. मात्र, पावसामुळे साऊथ अफ्रिकेला 152 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाकडून कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने दमदार 36 बॉलमध्ये 56 धावांची खेळी केली. या खेळीबरोबरच कॅप्टन सूर्यकुमार यादव याने विशेष यादीत स्थान मिळवलं आहे. टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 2000 धावा करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू आणि जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. सूर्यकुमार यादव याने 56 डावांमध्ये अद्भूत कामगिरी करून दाखवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी 52-52 डावांमध्ये 2000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. तर विराट कोहली (virat kohli record) आणि सूर्यकुमार यांनी 56-56 डावांमध्ये हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. त्यानंतर भारतीय विकेटकिपर फलंदाज केएल राहुलचे नाव आहे, ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 58 डावात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये भारतासाठी चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याआधी 4008 धावांसह विराट कोहली तर 3853 धावांसह रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर केएल राहुलचा नंबर लागतो, त्याने 2256 धावा कुटल्या आहेत. 


SA vs IND : सूर्यकुमार बाद होताच Tabraiz Shamsi चं खास सेलिब्रेशन; बुट काढून कोणाला लावला फोन?


टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.


दक्षिण आफ्रिका : एडेन मारक्रम (कॅप्टन), मॅथ्यू ब्रीट्जके, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसेन, एंडिले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्जी, लिजाद विलियम्स आणि तबरेज शम्सी.